BMC : एमएमआरडीएची आपल्या हद्दीतील खर्च देण्यास असमर्थता, मुंबई महापालिकेचा हा प्रकल्प रखडणार

एमएमआरडीएने मागील आठवड्यात महापालिकेला पत्र पाठवून या प्रकलाचा खर्च आपल्याला देणे शक्य नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे आधीच महापालिका हाती घेतलेले प्रकल्प कसेबसे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना त्यात या प्रकल्पाची भर पडल्याने एमएमआरडीएने हात वर केल्यास हा प्रकल्प रखडला जाण्याची दाट शक्यता आहे.

1418
BMC : महापालिकेत अनुभवी अभियंत्यांची फळी निवृत्त, कोस्टलच्या प्रमुख अभियंत्यावर रस्त्याचा भार
  • सचिन धानजी,मुंबई

दहिसर पश्चिम कांदरपाडा लिंक रोड ते भाईंदर पश्चिम सुभाषचंद्र बोस उद्यानापर्यंत महापालिकेच्यावतीने (BMC) उन्नत मार्ग बांधण्यात येत असून यासाठी तब्बल विविध करांसह ४०२७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रकल्पाची रक्कम एमएमआरडीए (MMRDA) अदा करेल असा दावा महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) केला होता. पण एमएमआरडीएशी (MMRDA) महापालिकेने केलेल्या पाठपुराव्याला आता अपयश आले असून एमएमआरडीने (MMRDA) या प्रकल्पाचा खर्च महापालिकेला (BMC) देण्यास असमर्थता दर्शवली आहे. एमएमआरडीएने (MMRDA) मागील आठवड्यात महापालिकेला (BMC) पत्र पाठवून या प्रकलाचा खर्च आपल्याला देणे शक्य नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे आधीच महापालिका हाती घेतलेले प्रकल्प कसेबसे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना त्यात या प्रकल्पाची भर पडल्याने एमएमआरडीएने हात वर केल्यास हा प्रकल्प रखडला जाण्याची दाट शक्यता आहे. (BMC)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एम.एम.आर.डी.ए (MMRDA) यांनी मुंबई शहराच्या पश्चिमेकडील क्षेत्रांना कांदरपाडा, लिंकरोड, दहिसर (पश्चिम) पासून सुभाषचंद्र बोस उद्यान, भाईंदर (पश्चिम) पर्यंत जोडणाऱ्या उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. परंतु, या प्रकल्पाचे काम त्यांनी सुरू केले नाही. या पुलाच्या जोडणाऱ्या मार्गात महापालिकेची हद्द १४८० मीटर लांबीची असून मिरा-भाईंदर महानगरपालिकेची (Mira-Bhayander Municipal Corporation) हद्द ही ३१०० मीटर लांबीची आहे. ४५ मीटर रुंदीचा हा मार्ग आहे. यासाठीची पहिली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्यानंतर दुसरी निविदा केली, त्यानुसार विविध करांसह ४०२७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामासाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड अर्थात एल अँड टी ही कंपनी पात्र ठरली आहे. (BMC)

(हेही वाचा – Online Shopping Fraud : सोशल मीडियावरील फसव्या जाहिराती आणि ग्राहकांची लूट)

मिरा भाईंदर हद्दीतील पूलाचा खर्च एमएमआरडीएचा

दहिसर-भाईंदर जोडरस्त्यासाठीचे बांधकाम हे कमाल ४२ महिन्यात करणे अपेक्षित आहे. तसेच, प्रकल्प परवानग्यांसाठी सहा महिने अतिरिक्त अंदाजित कालावधीचा समावेश आहे. हा प्रकल्प अंतर्गत मुंबई महानगरपालिका हद्दीत १.५ किमीचा उन्नत मार्ग आणि मिरा भाईंदर महानगरपालिका (Mira-Bhayander Municipal Corporation) हद्दीत ३.५ किमी उन्नत मार्गाचा समावेश असेल. या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) करण्यात येईल. तर मिरा भाईंदर हद्दीतील प्रकल्पासाठीच्या खर्चाचा परतावा हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगरपालिकेला (BMC) देण्यात असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. (BMC)

त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) महापालिका व्यतिरिक्त मिरा भाईंदर हद्दीतील पुलाच्या बांधकामाच्या खर्चाबाबत एमएमआरडीएला (MMRDA) कळवल्यानंतर प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीने महापालिकेला पत्र पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी वरिष्ठांनी सूचित केल्याप्रमाणे आम्ही आपल्याला याबाबत कळवत आहोत, असे नमुद करत या प्रकल्पाचा खर्च आपल्याला देऊ शकत नाही, असे सांगत एकप्रकारे असमर्थता दर्शवली होती. मुख्य म्हणजे हा प्रकल्पच मुळात एमएमआरडीए (MMRDA) राबवणार होते, पण त्यांनी हा प्रकल्प बाजुला ठेवला होता. परंतु राज्याच्या तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या निदेशानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी महापालिकेने करून याचा खर्च एमएमआरडीएने (MMRDA) महापालिकेला द्यावा अशाप्रकारच्या सूचना केल्या होत्या. तत्कालिन नगरविकास मंत्री जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या दालनात याबाबतच्या बैठका घेऊन या सूचना महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) या संपूर्ण प्रकल्पाच्या निविदा मागवल्या, परंतु दहिसरच्या हद्दीत महापालिकेने पूल बांधले तरी त्याचा काहीही फायदा नसून जर एमएमआरडीएने (MMRDA) तथा शासनाने या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून न दिल्यास महापालिकेला हा प्रकल्प गुंडाळून ठेवण्याची वेळ येणार आहे, असे बोलले जात आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.