अर्धनग्न अवस्थेत पोलीस ठाण्यात घुसून केली अधिकाऱ्याला मारहाण

166
अर्धनग्न अवस्थेत पोलीस ठाण्यात घुसून केली अधिकाऱ्याला मारहाण
अर्धनग्न अवस्थेत पोलीस ठाण्यात घुसून केली अधिकाऱ्याला मारहाण

पश्चिम उपनगरातील मालवणी पोलीस ठाण्यात अर्धनग्न अवस्थेत घुसलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला आवर घालण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक बोलावून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना झालेल्या मारहाणीची चर्चा संपूर्ण मालवणी परिसरात सुरू आहे. जिथे पोलीसच असुरक्षित असल्यास सामान्य नागरिकांची सुरक्षा कोण करणार अशी चर्चा सुरू आहे.

इम्रान कमाल सय्यद उर्फ येडा इम्रान असे या तरुणाचे नाव आहे. मालवणी परिसरातील गेट नंबर ८ आझमी नगरमध्ये राहणारा येडा इम्रान हा रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्धनग्न अवस्थेत मालवणी पोलीस ठाण्यात शिरला, पोलीस ठाण्यात प्रवेश करताच त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून पोलिसांना धमकावू लागला. त्याचा तो अवतार बघून कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस शिपाई घाबरून बाजूला झाल्या. दरम्यान कर्तव्यावर असणारे ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सचिन म्हस्के यांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच येडा इम्रान याने म्हस्के यांच्या नाजूक ठिकाणी लाथेने प्रहार केला असता पीएसआय म्हस्के एका बाजूला झाले, त्याला आवरण्यासाठी म्हस्के यांनी पोलिसांची अधिक कुमक बोलावून त्याला ताब्यात घेण्यात आले.

(हेही वाचा – ‘सिरीयल मॉलस्टर’ला अटक १८हून अधिक मुलींचा केला विनयभंग)

त्यानंतर देखील येडा इम्रान याने स्वतःचे डोके भिंतीवर आपटून स्वतःला जखमी करून घेत पोलिसांनी मला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर केला. पोलिसांनी त्याला कसेबसे आवरून शांत केले व त्याला पोलीस कोठडीत डांबून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येडा इम्रान हा मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची चर्चा मालवणी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीसच गुंडाचा मार खाऊ लागल्यावर सामान्यांची सुरक्षा पोलीस कसे करणार अशी चर्चा मालवणीमध्ये सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.