मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ अंतर्गत २०० वॉन्टेड पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई पोलिसांकडून शहारासह उपनगरात शनिवारी (२४ जून) रात्री 'ऑपरेशन ऑल आउट' ही मोहीम राबविण्यात आली.

162
मुंबई पोलिसांच्या 'ऑपरेशन ऑल आउट' अंतर्गत २०० वॉन्टेड पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आउट’ अंतर्गत तब्बल २०० वॉन्टेड गुन्हेगारांना अटक केली आहे. यामध्ये वॉन्टेड असलेले गुन्हेगार, ड्रग्ज तस्कर यांच्यासह २०० पेक्षा अधिक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच या ऑपरेशन अंतर्गत शहरात राबविण्यात आलेल्या नाकाबंदीत सुमारे ६ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांकडून शहारासह उपनगरात शनिवारी (२४ जून) रात्री ‘ऑपरेशन ऑल आउट’ ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अनेक दिवसांपासून वॉन्टेड असणारे गुन्हेगार, ड्रग्ज तस्कर, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे, पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे. या धरपकडीत वॉन्टेड असणाऱ्या गुन्हेगारांपैकी २०० जणांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – “मुंबईत ४०० एमएम पाऊस झाला” : आदित्य ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार यांनी केली टीका; म्हणाले …)

या कारवाई दरम्यान ६०० हून अधिक हॉटेल्स, लॉज आणि इतर आस्थापनांची तपासणी करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी २८ जणांना अटक करण्यात आलेली असून महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत ६९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर कारवाई दरम्यान ५,९२७ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.