MLC Elections Maharashtra : ५ जागांसाठी रणशिंग फुंकले; मतदानाची तारीख ठरली, आता इच्छुकांची धावपळ सुरू

15
Voting process in Amravati teacher constituency.
MLC Elections Maharashtra : ५ जागांसाठी रणशिंग फुंकले; मतदानाची तारीख ठरली, आता इच्छुकांची धावपळ सुरू
  • प्रतिनिधी

MLC Elections Maharashtra          महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचालींनाही आता वेग येण्याची शक्यता आहे. (MLC Elections Maharashtra)

या निवडणुकीत औरंगाबाद, पुणे आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघांचा, तर अमरावती आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही मतदारसंघांतील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. (MLC Elections Maharashtra)

(हेही वाचा – Drug Cartel Encounter : पळून जाण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या गोळीबारात ड्रग्ज माफिया जखमी)

निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. (MLC Elections Maharashtra)

यानंतर २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या पाचही मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. (MLC Elections Maharashtra)

(हेही वाचा – युईएफए नेशन्स लीगपूर्वी Cristiano Ronaldo पोर्तुगालच्या संघात सामील)

औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान घेण्याचे जाहीर केले आहे. २७ ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. (MLC Elections Maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.