Navi Mumbai Fire : दिघ्यात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग; व्हिडिओ व्हायरल, आगीचे नेमके कारण काय?

गोदामात लाकडी फर्निचर, सोफे, फोम, गाद्या आणि इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, आग काही वेळातच झपाट्याने पसरली.

16
Navi Mumbai Fire
नवी मुंबईच्या दिघ्यामध्ये अग्नितांडव

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील दिघा परिसरात रविवार, 20 सप्टेंबरच्या संध्याकाळी उशीरा फर्निचर आणि सोफ्याच्या गोदामाला भीषण आग लागली. ईश्वरनगर परिसरात, मुकुंद कंपनीजवळ ही घटना घडली. आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

गोदामात लाकडी फर्निचर, सोफे, फोम, गाद्या आणि इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, आग काही वेळातच झपाट्याने पसरली. आगीची तीव्रता वाढत गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. गोदामातून निघणाऱ्या धुराचे आणि आगीच्या ज्वाळांचे दृश्य पाहून स्थानिकांमध्येही खळबळ उडाली. (Navi Mumbai Fire)

अग्निशमन दलाचे तात्काळ बचावकार्य

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग मोठी असल्याने इतर अग्निशमन केंद्रांमधूनही अतिरिक्त बंब मागवण्यात आले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या बाजूंनी पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

आग आसपासच्या औद्योगिक युनिट्स आणि इमारतींपर्यंत पोहोचू नये, यासाठी अग्निशमन दलाने विशेष प्रयत्न केले. काही काळाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. (Navi Mumbai Fire)

PTIच्या वृत्तानुसार, दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार यामध्ये 2 ते 3 जण जखमी झाल्याचे समजते.

(सौजन्य: UjjwalDobhal/X)

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

आग नेमकी कशामुळे लागली, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र अंतिम कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, आगीमुळे गोदामातील फर्निचर आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र एकूण आर्थिक नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. (Navi Mumbai Fire)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.