ATS : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पासपोर्ट बाळगल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात उघडकीस आला आहे. चांद अली अब्दुल रशीद सैयद (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला मलंगगड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस करत असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई एटीएसनेही (ATS) स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद अली याने २००९ मध्ये भारताचा पासपोर्ट मिळवला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात गेला. तेथे वास्तव्यास असताना त्याने आपले भारतीय नागरिकत्व लपवले आणि ‘चांद अली रशीद अली’ या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी पासपोर्ट मिळवला.
हेही वाचा – Lalbaug च्या काळाचौकीत विजेचा शॉक लागून ८ वर्षाच्या मुलीसह दोघांचा मृत्यू; शीतपेय स्टॉल चालकावर गुन्हा दाखल
यानंतर, याच पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारे त्याने भारतात प्रवेश केला आणि तो अंबरनाथ परिसरात राहू लागला. विशेष म्हणजे, भारतात परतल्यानंतर २०२४ मध्ये त्याने आपली जुनी माहिती लपवून पॅन कार्ड, डोमिसाइल आणि इतर कागदपत्रांच्या आधारे पुन्हा नवीन भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा त्याच्यावर आरोप आहे


