
Sonam Maskar: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये भारताने पहिले पदक पटकावले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदर्सा कोचालुमकाल विनोद यांच्या संघाने रौप्यपदक जिंकले. भारताने १८९८.० गुणांसह दुसरे स्थान मिळवले.
सोनमने ६३४.१ गुणांसह पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवत संघाच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली. एलावेनिलने ६३३.५ तर विदर्साने ६३०.४ गुणांची नोंद केली. सोनमने तिच्या नेमबाजीतील यशस्वी कारकिर्दिसाठी तिचे वडील उत्तम मस्कर यांनी रायफल खरेदी करण्यासाठी जमीन विकली होती. त्यांनी अनेक अडचणींचा सामना करत आपल्या मुलीचे भवितव्य घडवण्यासाठी तिला साथ दिली. सोनमने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देऊन वडिलांनी केलेल्या त्यागाचे चीज केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

