Balochistan : हायवेवर दहशतवाद्यांचा हैदोस; सैन्याची धडक कारवाई, 5 ठार अन् 23 बंधकांची सुटका

दहशतवाद्यांनी प्रवाशांचे अपहरण, खंडणी वसुली आणि वाहने लुटण्यासाठी हायवेवर तात्पुरता नाका उभारला होता

16
Balochistan violence
बलुचिस्तानमध्ये लष्करी कारवाई

Balochistan : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत, हायवे अडवणाऱ्या 5 दहशतवाद्यांना ठार केले. तसेच 23 बंधकांची सुटका केली. कलातजवळील NH-25 वर ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तान सशस्त्र दलांची मीडिया आणि जनसंपर्क शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने याबाबत माहिती दिली.

‘द न्यूज’च्या वृत्तानुसार, ISPR ने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, दहशतवाद्यांनी वाहतूक रोखून नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवाद्यांनी प्रवाशांचे अपहरण, खंडणी वसुली आणि वाहने लुटण्यासाठी हायवेवर तात्पुरता नाका उभारला होता. (Balochistan)

हेही वाचा: Kalachowki Mahaganpati : मुंबईतील काळाचौकीच्या महागणपतीजवळ विजेच्या धक्क्याने 8 वर्षीय मुलीचा मृत्यू, पाच जण जखमी

याविषयी माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर झालेल्या कारवाईत 5 दहशतवादी ठार झाले आणि 23 बंधकांची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली.

सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून 6 ट्रक, 3 बस आणि 2 कार ताब्यात घेतल्या. ही कारवाई ‘ऑपरेशन रद्दुल फितना 3’ अंतर्गत करण्यात आल्याचे ISPR ने सांगितले. (Balochistan)

दरम्यान, शनिवारी सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजगुर आणि चगाई जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये 11 दहशतवादी ठार झाले. पंजगुरच्या गोवारगो परिसरात 5, तर चगाई जिल्ह्यातील अमीनबाद आणि सियाह चांग परिसरात 6 दहशतवादी ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: Tata Sons – N Chandrasekaran : चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवरून टाटा सन्समध्ये संघर्ष; वाद न्यायालयात जाण्याची शक्यता

वाहनाला IED ने लक्ष्य

बलुचिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. खारानमधील कॉलेज रोडवर दहशतवाद्यांनी एका प्रवासी वाहनाला इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) च्या माध्यमातून लक्ष्य केले. या हल्ल्यात 10 मजूर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Balochistan)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.