Sourav Ganguly Biopic : गांगुलीच्या बायोपिकमुळे इंग्लंडमध्ये खेळपट्टीचा वाद; निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

Sourav Ganguly Biopic : खेळपट्टी खराब झाल्यावरून वाद निर्माण झाला होता. 

15
Sourav Ganguly Biopic : गांगुलीच्या बायोपिकमुळे इंग्लंडमध्ये खेळपट्टीचा वाद; निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण
  • ऋजुता लुकतुके

Sourav Ganguly Biopic             भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या आयुष्यावर आधारित आगामी चरित्रपट सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. इंग्लंडमधील लिसेस्टरशायर काऊंटी संघाला खराब खेळपट्टीप्रकरणी तब्बल २७ गुणांचा दंड झाल्यानंतर या प्रकरणात गांगुलीच्या बायोपिकच्या चित्रिकरणाचाही उल्लेख झाला. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रिकरणासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि नियमांचे पालन करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. (Sourav Ganguly Biopic)

लिसेस्टरमधील ग्रेस रोड मैदानावर २० ते २३ ऑगस्टदरम्यान लिसेस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात काऊंटी चॅम्पियनशिपचा सामना झाला. या सामन्यात लिसेस्टरशायरने ४२ धावांनी विजय मिळवला. मात्र, सामन्यात खेळपट्टीवर असमान उसळी आणि तडे दिसून आले. सामनाधिकारी इयान रॅमेज यांनी तब्बल ४३ वेळा चेंडू असमान उसळत असल्याची नोंद केली. त्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट नियामक संस्थेने लिसेस्टरशायरविरोधात खराब खेळपट्टी तयार केल्याचा आरोप केला. (Sourav Ganguly Biopic)

(हेही वाचा – Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या घसरणीचा तिसरा दिवस; ब्रेट क्रूड १०२ डॉलरच्या खाली)

या सुनावणीदरम्यान लिसेस्टरशायरचे मुख्य मैदान कर्मचारी कॅलम लेविन यांनी खेळपट्टीच्या तयारीवर परिणाम करणाऱ्या कारणांमध्ये गांगुलीच्या बायोपिकच्या चित्रिकरणाचा उल्लेख केला. सामन्याच्या चार दिवस आधी मैदानावर एका दिवसाचे चित्रपटाचे चित्रिकरण झाले होते. त्या काळात खेळपट्टीवर काम करण्याची किंवा ती झाकण्याची परवानगी नसल्याचे लेविन यांनी सांगितले. त्याचवेळी इंग्लंडमध्ये तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअस होते. (Sourav Ganguly Biopic)

मात्र, शिस्तपालन समितीने चित्रपटाचे चित्रिकरण हा खराब खेळपट्टीमागील पुरेसा कारणीभूत घटक असल्याचे मान्य केले नाही. समितीच्या मते, चित्रिकरण केवळ एका दिवसाचे होते आणि लिसेस्टरशायरची खेळपट्टी तयार करण्याची पद्धत अवाजवी होती. त्यामुळे संघाकडून जाणीवपूर्वक खराब खेळपट्टी तयार करण्यात आली नसली, तरी तिच्या तयारीबाबतचा दृष्टिकोन योग्य नव्हता, असे समितीने नमूद केले. (Sourav Ganguly Biopic)

(हेही वाचा – Crime : मुंबईतील व्यावसायिकाकडे २.२५ कोटींची खंडणी; जयपूरमधील २ ‘ईडी’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल)

या निर्णयानुसार लिसेस्टरशायरचे ग्लॅमॉर्गनविरुद्ध मिळवलेले १९ गुण रद्द करण्यात आले. त्याशिवाय आणखी आठ गुणांचा दंड आणि पाच हजार पाऊंडांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला. आणखी आठ गुणांची शिक्षा २०२७ च्या हंगामाच्या अखेरपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. संघाला या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (Sourav Ganguly Biopic)

दरम्यान, गांगुलीच्या बायोपिकची निर्मिती करणाऱ्या एलयूव्ही फिल्म्सने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, चित्रीकरण आधीच नियोजित होते आणि आवश्यक त्या सर्व परवानग्या व नियमांचे पालन करूनच ते करण्यात आले. चित्रिकरणाशी संबंधित कोणतीही समस्या निर्माण झाल्याची माहिती आपल्याला नसल्याचेही निर्मात्यांनी स्पष्ट केले. (Sourav Ganguly Biopic)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.