महाराष्ट्रात ‘Health Impact and Innovation Hub’; स्थानिक आरोग्य समस्यांवर स्थानिक उपाय शोधण्यावर भर

20
Health Impact and Innovation Hub
Health Impact and Innovation Hub

Health Impact and Innovation Hub : महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रातील स्थानिक समस्या ओळखून त्यावर प्रत्यक्ष परिस्थितीत उपयोगी ठरणारे उपाय विकसित, तपासून पाहण्यासाठी आणि प्रभावी उपायांचा राज्यभर विस्तार करण्यासाठी ‘Maharashtra Impact and Innovation Hub’ विकसित करण्यात येत आहे. राज्याच्या ‘Health for All’ या उद्दिष्टाला पूरक ठरणाऱ्या या उपक्रमात सरकार, आरोग्यसेवा क्षेत्र, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, संशोधक, innovators आणि development partners यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या Hubचा मुख्य उद्देश केवळ नवीन तंत्रज्ञान आणणे नसून, महाराष्ट्रातील विविध भागांच्या आरोग्यविषयक गरजा समजून घेऊन त्या अनुषंगाने प्रत्यक्ष वापरता येतील असे उपाय तयार करणे हा आहे. स्थानिक पातळीवर तयार झालेल्या उपायांची प्रत्यक्ष आरोग्य व्यवस्थेत चाचणी घेतली जाईल. त्यातून कोणते intervention परिणामकारक ठरतात, त्याचे पुरावे जमा केले जातील आणि परिणाम दिसून आलेल्या उपायांचा इतर जिल्हे किंवा भागांमध्ये विस्तार करण्याचा विचार केला जाणार आहे.

या उपक्रमात Artificial Intelligence (AI), Digital Health, Data आणि Precision Health यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या शक्यतांचाही विचार केला जाणार आहे. मात्र, तंत्रज्ञान हा या उपक्रमाचा एकमेव केंद्रबिंदू नसून विद्यमान आरोग्य व्यवस्था आणि उपचाराच्या पद्धती अधिक मजबूत करणे, रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवणे आणि आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारण्यावरही भर असेल.

(हेही वाचा – India Pakistan Naval Collision : भारत-पाक नौदल जहाजांची धडक; पाकिस्तानी राजनयिकाला तातडीने समन्स, अरबी समुद्रात नेमकं काय घडलं?  )

महाराष्ट्राच्या खासगी आरोग्य क्षेत्रातील क्षमता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या गरजा यांच्यात अधिक चांगला समन्वय निर्माण करण्याची संधी या Hubमुळे उपलब्ध होऊ शकते. स्थानिक गरजांनुसार परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारे उपाय विकसित करण्याबरोबरच समुदायाच्या गरजांशी संबंधित skilling, employment आणि enterprise development यांच्याही शक्यता तपासल्या जाणार आहेत.

महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात innovationची संकल्पना पूर्णपणे नवीन नाही. राज्याच्या State Health Systems Resource Centre (SHSRC) अंतर्गत आधीपासूनच State Innovation Hub कार्यरत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील innovative आणि replicable practices ओळखणे, त्यांची पडताळणी करणे आणि त्यांचा विस्तार करणे हे त्याचे काम आहे. SHSRCच्या माहितीनुसार हा Hub पुण्यात कार्यरत असून, विविध जिल्ह्यांमधील field-level innovationsचा अभ्यास करून त्यांची परिणामकारकता तपासण्याची व्यवस्था त्यामध्ये आहे.

नव्या Maharashtra Impact and Innovation Hubच्या माध्यमातून या प्रयत्नांना व्यापक ecosystemशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाला MSD for Mothersचा पाठिंबा असून, विविध सहभागी संस्था आणि collaborators यांना एकत्र आणून मॉडेल विकसित केले जात आहे.

या उपक्रमातील एक उदाहरण म्हणून Manyata कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला आहे. Federation of Obstetric and Gynaecological Societies of India (FOGSI)चा हा उपक्रम खासगी आरोग्य सुविधांमध्ये मातृआरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यावर केंद्रित आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील प्रयत्नांना पूरक ठरू शकणाऱ्या खासगी क्षेत्रातील quality-improvement modelचे हे उदाहरण म्हणून मांडण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.