
-
प्रतिनिधी
CM Devendra Fadnavis मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्यावर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न, सिंचन प्रकल्प, औद्योगिक विकास आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली होती. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते समोरासमोर आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या राजकीय संघर्षाकडे लागले होते. (CM Devendra Fadnavis)
विरोधी पक्षांनी मराठवाड्यातील विकासाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत जनआंदोलनाची हाक दिली होती. सरकारच्या विकासकामांच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करत, प्रशासकीय अनागोंदी आणि निधीच्या तुटवड्यावरून सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला. सरकारच्या कार्यक्षमतेवर थेट बोट ठेवत विरोधकांनी या मोहिमेला एका लोकप्रिय संवादाचे नाव देऊन राजकीय वातावरण ढवळून काढले होते. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – १५ मिनिटं पुस्तक वाचलं की मिळणार पैसे! काय आहे Singapore सरकारची ही भन्नाट योजना?)
या सगळ्यावर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाने मराठवाड्यातील प्रश्नांवर आयोजित केलेल्या ‘तुमसे ना हो पायेगा’ या आंदोलनाचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना मनाला लागेल असा टोला लगावला. ज्यांनी आपल्या सत्ताकाळात अडीच वर्षे मराठवाड्याच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले, जलसंधारण आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प रोखून धरले, तेच आज इथे येऊन आंदोलनाचा देखावा करत आहेत; वास्तविक पाहता जनतेला चांगले ठाऊक आहे की मराठवाड्याचा विकास नेमका कोणाकडून शक्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती पलटवार केला. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
