Manoj Jarange Patil यांना मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारण्यासाठी याचिका; कोणी केला विरोध?

मुंबई पोलिसांनी दोन वेळा अर्ज फेटाळल्यानंतरही जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

3

मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) यांना मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली असून यावर १७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मुंबई पोलिसांनी दोन वेळा अर्ज फेटाळल्यानंतरही जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एमी फाऊंडेशन’ या संस्थेने ॲड. महेंद्र रत्ना यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारलेली असताना आता न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा ठाकरेंनी वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखा पक्ष चालवला; Eknath Shinde यांच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद)

याचिकेतील मुख्य मुद्दे:

  • गणेशोत्सवातील संभाव्य अडथळा: मुंबईत सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.  (Manoj Jarange Patil)
  • सार्वजनिक जागांची कोंडी: आंदोलनामुळे मुख्य रस्ते आणि सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी रोखल्या जाण्याची शक्यता असून, त्यामुळे सामान्य मुंबईकरांची मोठी गैरसोय होईल.
  • नियमांचे उल्लंघन: नागरिकांना आंदोलनाचा अधिकार असला तरी ‘सार्वजनिक सभा, आंदोलने व मिरवणुका नियमावली २०२५’ नुसार इतरांच्या हक्कांवर गदा आणता येत नाही.  (Manoj Jarange Patil)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.