-
प्रतिनिधी
Goa Cyber Crime Hub ‘गोवा’ राज्यातील समुद्र किनारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारासाठी ‘मनी ट्रान्सफर’ चे हब बनले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध युनिटने मागील दोन महिन्यात महिन्याभरात गोव्यातील समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्ट तसेच खाजगी व्हीलावर छापे टाकून सायबर गुन्ह्यातील पैसे म्युल बँक खात्यावर बेकायदेशीररित्या मनी ट्रान्सफर करणाऱ्या दोन विविध टोळ्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही टोळ्या गुजरात राज्यातील असून या टोळ्यांचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय सायबर टोळ्यांशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या या दोन्ही टोळ्यांनी मागील सहा महिन्यात एक हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम विविध म्युल बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Goa Cyber Crime Hub)
मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट-२ ने आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर ऑनलाइन जुगार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गोव्यातील कलांगुट येथील एका आलिशान व्हिलावर धाड टाकून पोलिसांनी १२ सराईत आरोपींना अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांत या टोळीने सायबर फसवणुकीद्वारे मिळवलेले ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदेशीररित्या मिळवलेली रक्कम विविध खात्यांमध्ये वळती केली आहे. क्राईम ब्रँचच्या तत्परतेमुळे बँक खात्यांमध्ये शिल्लक असलेले १०० कोटी रुपये तात्काळ गोठवण्यात (फ्रीज) आले होते. या कारवाई पाठोपाठ गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पथकाने गोव्यातील एका आलिशान व्हिलामधून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सात आरोपींना अटक करून मुंबईत आणले असून, या टोळीने देशभरातील पीडितांची तब्बल ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Goa Cyber Crime Hub)
(हेही वाचा – डोक्यावर फेटे अन् बाप्पाचे दर्शन; ८ देशांच्या वाणिज्यदूतांनी अनुभवला मुंबईच्या Ganeshotsav चा ऐतिहासिक सोहळा)
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आधी मालाडमधील एका सोसायटीतून काम करणाऱ्या आणि ‘म्यूल’ (बनावट) बँक खात्यांची व्यवस्था करणाऱ्या तीन जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त (DCP) राज तिलक रौशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व सातही आरोपी मूळचे गुजरातच्या अहमदाबाद, मेहसाणा आणि गांधीनगर भागातील आहेत. आरोपी २० ते ३० वयोगटातील असून त्यांचे शिक्षण केवळ १० वी ते १२ वीपर्यंत झालेले आहे. हे आरोपी गेल्या काही महिन्यांपासून गोव्यातील वेगवेगळ्या व्हिलामध्ये वास्तव्यास होते आणि तेथूनच हे गैरव्यवहार चालवत होते. (Goa Cyber Crime Hub)
तपासात उघड झाले आहे की, आरोपींनी पैसे वळवण्यासाठी स्वतः विकसित केलेल्या एका अॅपचा वापर केला होता. त्यांना दुबईतील मुख्य सूत्रधारांकडून थेट सूचना मिळत असत. त्या सूचनांच्या आधारे फसवणूक करून मिळवलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम अनेक बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने फिरवली जात होती. (Goa Cyber Crime Hub)
(हेही वाचा – Imran Khan Health : इम्रान खान यांच्यासाठी ७ ऑस्ट्रेलियन कर्णधार उतरले मैदानात; सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी)
मागील प्रकरणाशी संबंध नाही
दरम्यान, गेल्या महिन्यात गुन्हे शाखेने गोव्यात अशाच प्रकारे कारवाई करत आणखी एका व्हिलावर छापा टाकला होता. या दोन्ही प्रकरणांची गुन्ह्याची पद्धत (मोडस ऑपरेंडी) सारखीच असली, तरी या दोन्ही टोळ्यांमध्ये थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या रॅकेटमधील दुबईतील सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. या दोन्ही कारवाईमुळे गोवा हे सायबर गुन्ह्यातील ‘मनी ट्रान्सफर’चे हब बनले असल्याची माहिती समोर येत आहे. (Goa Cyber Crime Hub)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

