Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. जिरीबाम जिल्ह्यातील लेइसंग कुकी गावात शेतात काम करत असताना दोन आदिवासी महिलांची हत्या केल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. याशिवाय अनेक फार्महाऊस जाळण्यात आले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चोंगा सितलो (६०) आणि किंबोई सिंग्सन (३०) अशी हत्या करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. दोघीही शेतात काम करत असताना त्यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या. यात दोघींचा मृत्यू झाला. तर शेतात काम करत असलेले अनेक गावकरी बेपत्ता आहेत. परिसरातील आणि आजूबाजूच्या अनेक फार्महाऊसला देखील आग लावण्यात आली.
हेही वाचा – Brendan Taylor कडून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित
या घटनेमुळे जिरीबाम-तामेंगलोंग पट्ट्यात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षेबाबतची चिंता अधिकच वाढली आहे. टोलेन, लॉंगपी आणि आता लेइसंग येथे झालेल्या हल्ल्यांच्या या मालिकेमुळे कुकी-झो नागरी समाज संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

