Bhiwandi Fire : भिवंडीत मध्यरात्री आगीचा थरार; पार्किंगमधील दुचाकींनी घेतला पेट, १४ गाड्या जळून खाक

Bhiwandi Fire : भिवंडीत मध्यरात्री आगीचा थरार; पार्किंगमधील दुचाकींनी घेतला पेट, १४ गाड्या भस्मसात

12
Bhiwandi Fire
Bhiwandi Fire

Bhiwandi Fire : भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या उमर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बुधवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तब्बल १३ ते १४ दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

खंडूपाडा येथील उमर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत पार्किंगमधील दुचाकींना आपल्या कवेत घेतले. आगीची तीव्रता वाढल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

या आगीत १३ ते १४ दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून त्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी टोरेंट पॉवर कंपनीच्या कथित निष्काळजीपणाचा आरोप केला. टोरेंट पॉवरचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शांतिनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.