Bhandara Crime : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमांकडून अत्याचार; निषेधार्थ स्थानिकांकडून शहरात कडकडीत बंद!

191
Bhandara Crime : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमांकडून अत्याचार; निषेधार्थ स्थानिकांकडून शहरात कडकडीत बंद!
Bhandara Crime : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमांकडून अत्याचार; निषेधार्थ स्थानिकांकडून शहरात कडकडीत बंद!

Bhandara Crime : भंडारा शहरातून एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीला ३० वर्षीय तरुणाने आमिष दाखवून तिच्यावर सार्वजनिक शौचालयात लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण भंडारा शहरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ची हाक देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना गुरुवारी ६ ऑगस्टला दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर वॉर्ड परिसरात घडली. आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती आहे. रोहित वासनिक (Rohit Wasnik) असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून तो अविवाहित आहे. तसेच तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने चिमुकलीला शौचालयात नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांच्या ही बाब तात्काळ लक्षात आली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून आरोपी रोहित याला जागेवरच पकडले आणि संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला. जमावाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात आरोपीने स्वतःला टाइल्सच्या तुकड्याने मारहाण करून दुखापत करून घेतली.

(हेही वाचा – Maharashtra Minority : अल्पसंख्याक दर्जाचा ‘गेम’ बदलणार? सरकारच्या नव्या नियमांमुळे अनेक संस्थांचे धाबे दणाणणार)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटनेनंतर पीडित बालिका आणि जखमी आरोपी या दोघांनाही उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये (Bhandara Medical College) दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच शेकडो भंडारावासी मेडिकल कॉलेज परिसरात जमा झाले. “नराधम आरोपीवर उपचार करू नका आणि त्याला तात्काळ नागरिकांच्या स्वाधीन करा,” अशी आक्रमक भूमिका घेत संतप्त नागरिकांनी थेट रुग्णालयात ठिय्या मांडला.

या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, तसेच आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये, या मागणीसाठी आज भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.