Petrol Diesel Price Today : इंधनाच्या दरात काय नवे बदल? जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

भारतात शुक्रवारी (7 ऑगस्ट) पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये कोणताही विशेष बदल करण्यात आलेला नाही

97
Petrol Diesel Price Today
पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर जाणून घ्या

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात केलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता वाढली असून त्याचा परिणाम ब्रेंट क्रूडच्या किमतीवर दिसून येत आहे. मात्र, या घडामोडी असूनही, भारतात शुक्रवारी (7 ऑगस्ट) पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये कोणताही विशेष बदल करण्यात आलेला नाही. (Petrol Diesel Price Today)

देशातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले. त्यानुसार प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.

हेही वाचा: Mumbai-Pune Expressway : फॉर्च्युनरने अचानक ब्रेक दाबला अन् 5 वाहनांचा…भीषण अपघाताचा CCTV व्हिडिओ व्हायरल

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरच्या पुढे गेली आहे. इराण आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे तेलवाहतुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारातील या वाढीचा परिणाम अद्याप देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरांवर झालेला नाही. (Petrol Diesel Price Today)

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली
  • पेट्रोल : ₹94.72 प्रति लिटर
  • डिझेल : ₹87.62 प्रति लिटर
मुंबई
  • पेट्रोल : ₹103.44 प्रति लिटर
  • डिझेल : ₹89.97 प्रति लिटर
चेन्नई
  • पेट्रोल : ₹100.85 प्रति लिटर
  • डिझेल : ₹92.44 प्रति लिटर
कोलकाता
  • पेट्रोल : ₹103.94 प्रति लिटर
  • डिझेल : ₹90.76 प्रति लिटर (Petrol Diesel Price Today)

हेही वाचा: इलॉन मस्क यांच्या SpaceX रॉकेटची चंद्रावर जोरदार धडक; धुळीचा प्रचंड लोट, व्हिडिओ व्हायरल

बेंगळुरू
  • पेट्रोल : ₹102.92 प्रति लिटर
  • डिझेल : ₹89.02 प्रति लिटर
हैदराबाद
  • पेट्रोल : ₹107.46 प्रति लिटर
  • डिझेल : ₹95.70 प्रति लिटर

भारतातील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलर-रुपया विनिमय दर, वाहतूक खर्च आणि स्थानिक कर या घटकांचा इंधनाच्या दरांवर परिणाम होत असतो. (Petrol Diesel Price Today)

तुमच्या शहरातील दर कसे तपासाल?

घरबसल्या मोबाईलवरूनही तुम्ही पेट्रोल-डिझेलचे ताजे दर तपासू शकता.

  • Indian Oil (IOCL) ग्राहकांनी RSP <स्पेस> शहराचा कोड असा संदेश 9224992249 या क्रमांकावर पाठवावा.
  • BPCL ग्राहकांनी RSP असा संदेश 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  • HPCL ग्राहकांनी HPPRICE <स्पेस> शहराचा कोड असा एसएमएस 9222201122 या क्रमांकावर पाठवावा.

एसएमएस पाठवल्यानंतर काही क्षणांतच संबंधित शहरातील अद्ययावत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोबाईलवर प्राप्त होतात. (Petrol Diesel Price Today)

हेही पाहा: 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.