
-
प्रतिनिधी
Mumbai Crime Branch मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट-२ ने आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर ऑनलाइन जुगार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गोव्यातील कलांगुट येथील एका आलिशान व्हिलावर धाड टाकून पोलिसांनी १२ सराईत आरोपींना अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांत या टोळीने सायबर फसवणुकीद्वारे मिळवलेले ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदेशीररित्या मिळवलेली रक्कम विविध खात्यांमध्ये वळती केली आहे. क्राईम ब्रँचच्या तत्परतेमुळे बँक खात्यांमध्ये शिल्लक असलेले १०० कोटी रुपये तात्काळ गोठवण्यात (फ्रीज) आले आहेत. (Mumbai Crime Branch)
पायधुनी गुन्ह्याच्या तपासातून लागला सुगावा
या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याशी जोडलेले आहेत. पायधुनी प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी आणि तांत्रिक विश्लेषणावरून या रॅकेटची माहिती समोर आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत ‘म्यूल’ बँक खाते (बनावट खाती) आणि अॅक्टिव्हेटेड सिम कार्ड तयार केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही कागदपत्रे, चेकबुक, एटीएम कार्ड आणि पासबुक पोलिसांच्या नजरेतून वाचवण्यासाठी मुंबई-गोवा लक्झरी बसमधून गोव्याला पाठवले जात होते. (Mumbai Crime Branch)
(हेही वाचा – Crime : कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशाची लुबाडणूक; सोलापूरच्या भामट्यावर लोहमार्ग पोलिसांची झडप)
लक्झरी व्हीला बनला होता सायबर क्राईमचा कॉल सेंटर
गोपनीय माहितीच्या आधारे क्राईम ब्रँच युनिट-२ च्या पथकाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी गोव्यातील या व्हिलावर अचानक छापा टाकला. यावेळी १२ आरोपी कॉम्प्युटर आणि मोबाईलवर पैशांची हेराफेरी करताना रंगेहात पकडले गेले. हे सर्व आरोपी गुजरात आणि मुंबई येथील राहणारे आहेत. आरोपींना १५ दिवस बँक खात्यांमध्ये काही सेकंदांत पैसे ट्रान्सफर करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जात होते. यानंतर त्यांच्याकडून हा अवैध कारभार करून घेतला जात होता. (Mumbai Crime Branch)
दुबई कनेक्शन, ३५ हजार पगार आणि ३ टक्के कमीशन
पोलीस उपायुक राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण सिंडिकेट संयुक्त अरब अमिराती (दुबई) येथून चालवले जात होते. पकडलेले आरोपी अवघ्या ३५ हजार रुपयांच्या मासिक पगारावर आणि ३ टक्के कमिशनवर हा बेकायदेशीर पैसा विल्हेवाट लावण्याचे काम करत होते. आरोपी ‘१०० पॅनेल’ आणि ‘रुद्रा’ सारख्या सट्टेबाजी व सायबर फ्रॉड अॅप्सचा वापर करत होते. तपास यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून ही रक्कम शेकडो खात्यांमध्ये छोट्या-छोट्या टप्प्यांत ट्रान्सफर केली जात होती. (Mumbai Crime Branch)
(हेही वाचा – Dombivli : मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधात प्रवाशांचे आंदोलन)
१५० बँक खात्यांची माहिती उघड
छाप्यादरम्यान पोलिसांनी विलाधून १५ लॅपटॉप, ८५ मोबाईल फोन, १२८ एटीएम कार्ड, ७६ सिम कार्ड, २२ चेकबुक आणि ७७ पासबुक जप्त केले आहेत. या उपकरणांमधून १५० हून अधिक चालू बँक खात्यांची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनवर (१९३०) या खात्यांविरोधात देशभरातून ८३ हून अधिक तक्रारी नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. आता दुबईत बसलेल्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Mumbai Crime Branch)
अटक आरोपींची दिवसाला हजारोची कमाई
अटक करण्यात आलेले १२ आरोपी हे मूळचे गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि राजकोट शहरात राहणारे आहे. त्यातील काही जण गुजरात मध्ये कापड व्यवसायीकाकडे काम करीत होते.१० ते १२ पर्यत शिक्षण झालेले १२ ही आरोपी हे गोव्यातील कलांगुट बीच येथे मागील ६ ते ८ महिन्यापासून एका भाड्याच्या व्हीला मध्ये सायबर फ्रॉड ची रक्कम देशभरातील म्युल खात्यावर वळते करण्याचे काम करीत होते. (Mumbai Crime Branch)
अटक आरोपीना या बदल्यात मासिक ३५ ते ४० हजार रुपये पगार तसेच ३ टक्के कमिशन मिळत होते. आरोपीना म्युल खात्यावर रोकड वळती करण्याचे दोन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते अशी माहिती मुंबई क्राईम ब्रँच चे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अटक आरोपी हे २० ते २५ वयोगटातील असून प्रत्येक आरोपी एका दिवसाला २५ ते ३० लाख रुपयांचे ‘ट्रानजेक्शन’ (रोकड वळती) करीत होते, त्यातून प्रत्येकाला दिवसाला कमिशनपोटी ३० ते ३५ हजार रुपयांची कमाई होत होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (Mumbai Crime Branch)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
