महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. गुरुवारी ६ ऑगस्टला उबाठाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Adv Kapil Sibal) यांच्या युक्तिवादावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. ‘कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडलेले विधान म्हणजे काही अंतिम ब्रह्मवाक्य नाही,’ असे विधान करत नरेश म्हस्के यांनी उबाठाच्या दाव्यांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद रंगला आहे. (MP Naresh mhaske)
(हेही वाचा – कोकणातील खारेपाटणच्या १० होतकरू विद्यार्थिनींना सायकल भेट; Dombivli च्या रोटरी क्लबची कर्तव्यपूर्ती )
न्यायालयात केवळ कायद्याचे राज्य चालते
खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, न्यायालयात मांडल्या जाणाऱ्या युक्तिवादांवरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. विरोधक ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यांचा आधार घेऊन प्रसारमाध्यमांमध्ये वातावरणनिर्मिती करत आहेत, त्याला काहीही अर्थ नाही. न्यायव्यवस्था ही केवळ सादर केलेल्या पुराव्यांवर आणि संविधानातील तरतुदींवर चालते, कोणाच्याही वैयक्तिक युक्तिवादावर नाही, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. (MP Naresh mhaske)
(हेही वाचा – Dombivli : कर्तव्यदक्षता! जखमीला उचलून नेणाऱ्या महिला तिकीट तपासणीसावर कौतुकाचा वर्षाव)
पक्षावर आणि चिन्हावर आमचाच घटनात्मक अधिकार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लोकशाही मार्गाने आणि बहुमताच्या आधारे खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली आहे, असेही नरेश म्हस्के म्हणाले.उबाठा न्यायालयात कितीही मोठे दावे करत असला, तरी कायद्याच्या आणि लोकशाहीच्या चौकटीत आमचीच बाजू भक्कम आहे. त्यामुळे सिब्बल यांनी मांडलेला कोणताही मुद्दा कोर्टात अंतिम मानला जाऊ शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

