-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli डोंबिवलीच्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट मंडल ३१४२ तर्फे रोटरी क्लब ऑफ खारेपाटण मंडल ३१७० यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण व आजूबाजूच्या परिसरातील १० होतकरू विद्यार्थिनींना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले. या मुली शाळेत येण्या-जाण्यासाठी रोज ७ ते ८ किमी अंतर पायपीट करत असत. सायकल मिळाल्याने या मुलींचा आनंद द्विगुणित झाला आहे. (Dombivli)
(हेही वाचा – महाराष्ट्राची संस्कृती अन् भावनिक दुवा, १ लाख अमराठी चालकांनी शिकली मराठी भाषा; मंत्री Pratap Sarnaik यांची माहिती)
सायकलींचे वाटप झाल्यावर मुलींच्या चेहऱ्यावरचे हास्य मानसिक समाधान देते असल्याचे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे ज्येष्ठ सदस्य श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले. कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्यदक्षता या विषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर क्लबचे अध्यक्ष रो. अतुल गोखले यांचे स्वप्न होते की कोकणातील शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी भरीव मदत करून आपले आजोळ वरील प्रेम आणि माया दृढ करायची. यासाठी प्रथमतः नवीन क्लब स्थापन झालेला रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे संस्थापक अध्यक्ष रो. दयानंद कोकाटे आणि सचिव रो. अजय गुरसाळे यांच्याशी संपर्क करून संकल्पना मांडली आणि त्याला लगेच साथही मिळाली. (Dombivli)
(हेही वाचा – Dombivli : शास्त्रीनगर रूग्णालय हिंसाचार प्रकरण; आधारवाडी कारागृहात आरोपींची ओळख परेड)
सायकली लुधियाना येथून थेट कुडाळ गोडाऊन येथे १० दिवसांत आल्या. कणकवली येथे जोडणी करून १० सायकली शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय येथे सोमवारी वितरीत करण्यात आल्या. यावेळी खारेपाटणचे क्लब अध्यक्ष रो. मंगेश ब्रह्मदंडे, मानद सचिव रो. सुबोध देसाई, खजिनदार रो. शर्मिन काझी, उपक्रम प्रमुख संस्थापक अध्यक्ष रो. दयानंद कोकाटे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानपसर, पर्यवेक्षक संतोष राऊत, रो. प्रियेशा अमृते, रो. लक्ष्मीकांत हरयाण तसेच डोंबिवली वेस्ट क्लबतर्फे मानद सचिव रो. दत्ता कडुलकर, माजी अध्यक्ष रो. श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते. तसेच जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर याप्रसंगी उपस्थित होते. या सायकल वाटप कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. यापुढेही क्लबच्या वतीने वर्षभरात अनेक सामाजिक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे उपक्रम राबवण्याचा मानस सचिव रो. दत्ता कडूलकर यांनी व्यक्त केला. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

