भारतामध्ये नेटफ्लिक्सच्या (Netflix) यशस्वी प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Co-CEO) टेड सारंडोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारताच्या समृद्ध कथाकथन परंपरेच्या जोरावर देशाला ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’ बनवण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच नेटफ्लिक्सच्या दशकपूर्तीनिमित्त नेटफ्लिक्सनं नेटफ्लिक्स इंडिया स्टोरीटेलिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली आहे.(Netflix Co-CEO Ted Sarandos Meets PM Modi)
‘कथाकथनाची समृद्ध परंपरा अन् जागतिक केंद्र!’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उशिरा रात्री एक्सवर या भेटीची माहिती देत आनंद व्यक्त केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “टेड सारंडोस यांची भेट घेऊन आनंद झाला. भारताच्या प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. भारताला समृद्ध कथाकथनाची परंपरा आणि उत्कृष्ट सर्जनशील प्रतिभा लाभली आहे. या बळावर भारताला जागतिक दर्जाचे कंटेंट निर्मिती केंद्र म्हणून अधिक मजबूत करता येईल.”(Netflix Co-CEO Ted Sarandos Meets PM Modi)
पंतप्रधानांनी आपल्या पोस्टसोबत नेटफ्लिक्स इंडियाची पोस्टही शेअर केली. नेटफ्लिक्स इंडियाने म्हटले आहे की, “भारतातील नेटफ्लिक्सच्या १० वर्षांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करत आहोत. आमचे को-सीईओ टेड सारंडोस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट होणे हा आमच्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याच्या सामायिक दृष्टीकोनावर दोघांमध्ये चर्चा झाली.”(Netflix Co-CEO Ted Sarandos Meets PM Modi)
Netflix India Storytelling Initiative ची घोषणा
याच वेळी नेटफ्लिक्स इंडियाने Netflix India Storytelling Initiative या नव्या उपक्रमाची घोषणा केली. भारतीय सर्जनशील प्रौद्योगिकी संस्था (IICT) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.(Netflix Co-CEO Ted Sarandos Meets PM Modi)
या उपक्रमाअंतर्गत कौशल्य विकास (Skilling) आणि शैक्षणिक भागीदारी (Education Partnership) यांच्या माध्यमातून भारतातील नवोदित लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर सर्जनशील कलाकारांना प्रशिक्षण व संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. भारतीय प्रतिभेला जागतिक व्यासपीठ मिळावे आणि भारताची ओळख जागतिक कंटेंट हब म्हणून अधिक मजबूत व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.(Netflix Co-CEO Ted Sarandos Meets PM Modi)
Join Our WhatsApp Community


