Suicide : ‘माझ्या मृत्यूला हेच जबाबदार’; व्हॉट्सॲप स्टेटसवर सहकाऱ्यांची नावे, तरुणाची आत्महत्या

58
Suicide : ‘माझ्या मृत्यूला हेच जबाबदार’; व्हॉट्सॲप स्टेटसवर सहकाऱ्यांची नावे, तरुणाची आत्महत्या
Suicide : ‘माझ्या मृत्यूला हेच जबाबदार’; व्हॉट्सॲप स्टेटसवर सहकाऱ्यांची नावे, तरुणाची आत्महत्या

Suicide : ‘सलूनमध्ये माझे भांडण झाले आहे… मी माझ्या जीवाचे काहीतरी बरे-वाईट करेन,’ असा फोन पत्नीला केल्यानंतर अवघ्या काही तासांत २७ वर्षीय राहुल थोरात (Rahul Thorat) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी राहुलने व्हॉट्सॲप स्टेटसवर (WhatsApp status) स्वतःच्या मृत्यूला सलूनमधील चार सहकारी जबाबदार असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

राहुलने पत्नीला फोन करून सलूनमध्ये भांडण झाल्याचे सांगितले होते. तसेच आपण आपल्या जीवाचे काहीतरी बरे-वाईट करू शकतो, असेही त्याने सांगितले. पत्नीने त्याचा राग शांत झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल, असे गृहीत धरले. मात्र काही वेळातच राहुलने व्हॉट्सॲपवर धक्कादायक स्टेटस ठेवले.

(हेही वाचा – Honor : लडाखच्या सिंधू महाकुंभातून राष्ट्रीय एकात्मता, समतेचा संदेश; मुंबईत विशेष गौरव)

या स्टेटसमध्ये राहुलने सलूनमधील चार सहकाऱ्यांची नावे घेत, ‘माझ्या मृत्यूस हेच जबाबदार आहेत,’ असा आरोप केला. यासोबतच त्याने स्वतःचाच श्रद्धांजलीचा फोटो स्टेटसवर ठेवला. हा प्रकार पत्नीच्या निदर्शनास येताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने राहुलला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. नणंदीसह कुटुंबीयांनीही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुलने कोणत्याही फोनला प्रतिसाद दिला नाही.

राहुलशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. सुरुवातीला राहुल झोपला असावा, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र काही वेळानंतर राहुलला रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी राहुलने लिहिलेली चिठ्ठी, त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस आणि त्यातील आरोप याआधारे पत्नीने बंगूर नगर पोलिसांकडे (Bangur Nagar Police) तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी एनरिच सलूनमधील जास्मीन सोलंकी, राज सलमानी, सीमा धुमासिया आणि रेनुका कांबळे या सहकाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बांगुर नगर पोलिसांकडून सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.