Zed Gang : मुंबईत ‘डी’ गँग नंतर ‘झेड’ गँग सक्रिय, झेड’ गँगच्या म्होरक्यासह १२ जणांवर ‘मोक्का’

102
Zed Gang : मुंबईत 'डी' गँग नंतर 'झेड' गँग सक्रिय, झेड' गँगच्या म्होरक्यासह १२ जणांवर 'मोक्का'
Zed Gang : मुंबईत 'डी' गँग नंतर 'झेड' गँग सक्रिय, झेड' गँगच्या म्होरक्यासह १२ जणांवर 'मोक्का'

पश्चिम उपनगरात कुख्यात ‘डी’ गँगच्या धर्तीवर स्वतःची समांतर ‘झेड’ गँग (Zed Gang) चालवून परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखा युनिट-९ ने मोठी कारवाई करत झेड गँगचा (Zed Gang) म्होरक्या झुल्फीकार बेहलीम याच्यासह एकूण१२ आरोपींवर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई आली आहे.

Maharashtra Assembly 2024 दिव्यांग मतदारांची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था 2026 08 05T215408.061 e1785947105793

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झेड गँग पश्चिम उपनगरातील व्यावसायिक, कंत्राटदार आणि सर्वसामान्य नागरिकांना शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि खंडणी उकळणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे, संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून आर्थिक साम्राज्य उभे करण्याचे या टोळीचे मनसुबे होते.

(हेही वाचा – Kalyan Cyber Fraud : बँकेचे ॲप डाऊनलोड करताच खात्यातून ६.९७ लाख गायब; बाजारपेठ पोलिसांकडून तपास सुरू)

विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या टोळीच्या बेबंदशाहीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने सखोल तपास केला. त्यानंतर पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांच्या पूर्वपरवानगीने ४ ऑगस्ट रोजी मुख्य आरोपी झुल्फीकार बेहलीम, त्याचा भाऊ मोहसीन बेहलीम आणि इतर १० सहकाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या धडक कारवाईमुळे पश्चिम उपनगरातील संघटित गुन्हेगारीला मोठा सुरुंग लागला असून, या गँगचे आर्थिक स्रोत, इतर म्होरके आणि जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.