
महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थांची (Adulterated food) विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. प्रशासनाने राज्यभरात कृत्रिम पनीर अर्थात ‘ॲनालॉग चीज’च्या उत्पादनावर, साठवणुकीवर आणि विक्रीवर एका वर्षासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांचे धाबे यामुळे दणाणले आहेत. हॉटेल्स, उपहारगृहे आणि भोजन व्यवस्था पुरवणाऱ्या घटकांकडून होणारा बनावट पनीरचा वापर रोखण्यासाठी हे कठोर राजपत्र जारी करण्यात आले आहे. ( Tukaram Mundhe )
(हेही वाचा – PUNE: पुण्याची चारही धरणे १०० टक्के भरली, तरीही गुरुवारी ‘या’ भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन)
आर्टिफिशियल पनीरवर बंदी
FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे ( Tukaram Mundhe ) यांनी बुधवारी ५ ऑगस्टला मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात ॲनालॉग पनीर म्हणजे नॉन डेरी पनीर विकल जात होतं. त्याचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात 30 जुलैला अधिसूचना काढून उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली आहे.
दंडात्मक कारवाई होणार
पुढे बोलताना मुंढे यांनी सांगितले की, आम्ही 308 ठिकाणांवरून पनीरचे नमुने घेतले होते, त्यातील 35 टक्के नमुने घातक होते. आता आगामी काळात विशेष मोहिम राबवणार आहोत, जिथे गोदामं आहेत तिथे तपासणी होणार आहे. आता आगामी काळा आस्थापनांनी दुधाच्याच पनीरचा वापर करावा, कुणी बनावट पनीर विकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार आहोत.
28 लाख किलो साठा जप्त
तुकाराम मुंढे यांनी पुढे बोलताना सांगितले की, अन्न पदार्थांसंदर्भात 25 मे ते 31 जुलै पर्यंत मोठी कारवाई करण्यात आली. 3 हजार 136 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, तसेच 774 आस्थापन्ना नोटीसा पाठवण्यात आली आहे. तसेच 165 आस्थापनाचे परवाने रद्द करण्यात आले. या कतारवाईत 28 लाख 66 हजर 96 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत 55 कोटी रुपये होती. तसेच राज्यातील 890 फूड आऊट लेट्सची तपासणी करण्यात आली.
पनीर हा दुधाचा पदार्थ आहे पण ॲनालॉग पनीरमध्ये नॉन दुग्धजन्य पदार्थ आढळले आहेत, त्यामुळे त्यावर बंदीचा निर्णय घेतला आहे. अशा पनीरची छुप्या पद्धतीने विकली जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सगळे आदेश उत्पादक प्रक्रिया करणारे, वाहतुकदार , वितरक, विक्रेते यांच्यासाठी बंधनकारक असणार आहेत. आता हॉटेल देखील ॲनालॉग पनीर वापरू शकत नाही, कारण या पनीरमध्ये प्रोटीन पेक्षा वनस्पती चरबी आढळली आहे. जी शिक्षा गुटखाबंदी संदर्भात आहे, तीच शिक्षा ॲनालॉग पनीर विकणाऱ्यांना दिली जाणार आहे.
(हेही वाचा – PUNE: पुण्याची चारही धरणे १०० टक्के भरली, तरीही गुरुवारी ‘या’ भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन )
FDA ची मोठी कारवाई
- आता पर्यंत नष्ट केलेला माल – 28 लाख 66 हजार 096 किलो
- नष्ट केलेल्या मालाची किंमत – 55.72 कोटी
- 890 हॉटेलची तपासणी
- 329 हॉटेलला सुधारणा नोटीस बजावल्या
- 116 परवाने निलंबित
- 11 एफआयआर दाखल करण्यात आलेहेही पहा –

