MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग तीनच्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या अर्जाची तारीख वाढवून देण्यात आली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत एकूण २,९२९ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्याची मागणी उमेदवारांनी केली होती. ती मागणी मान्य झाली आहे.
इच्छुक उमेदवार २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत असेल.
महत्त्वाची बाब म्हणजे, चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारेच शुल्क भरावे लागणार आहेत. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६अशी असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

