LPG Rule Update: घरगुती गॅसधारकांनी १६ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, न केल्यास काय होतील परिणाम? वाचा

102
LPG Rule Update: घरगुती गॅसधारकांनी १६ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, न केल्यास काय होतील परिणाम? वाचा
LPG Rule Update: घरगुती गॅसधारकांनी १६ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, न केल्यास काय होतील परिणाम? वाचा

LPG Rule Update: देशभरातील LPG गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. सर्व घरगुती गॅस कनेक्शनधारकांनी  १६ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन गॅस कंपन्यांनी केले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास ग्राहकांना गॅस रिफिल बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याना सबसिडी मिळण्यास अडचणी येऊ शकतात तर काही प्रकरणांमध्ये घरगुती दराऐवजी व्यावसायिक दराने सिलेंडर घ्यावा लागू शकतो.

गॅस कंपन्यांच्या मते, e-KYC चा उद्देश प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणे, तसेच बनावट किंवा अनधिकृत कनेक्शन रोखणे आणि सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यासाठी सर्व वितरकांना १६ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त ग्राहकांची e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अडचणींत वाढ होण्याची शक्यता…
अनेक भागांमध्ये अजूनही मोठ्या संख्येने ग्राहकांनी e-KYC केलेली नाही. त्यामुळे गॅस एजन्सीकडून फोन कॉल, SMS तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून ग्राहकांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ग्राहकांना रिफिल बुकिंग तात्पुरते बंद होण्याबाबतचे संदेशही मिळू लागल्याची माहिती आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर  लाभ घेणाऱ्या ग्राहकांना अडचणी येण्याची शक्यता आहे.
e-KYC प्रक्रिया कशी कराल? 
ग्राहक आपल्या जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन किंवा संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन सुविधेद्वारे e-KYC पूर्ण करू शकतात. यासाठी आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी केली जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाच्या गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत केली जाते. Indian Oil Corp Ltd ने आपल्या X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट कशी केली असून यात ‘eKYC’ कशी करता येईल याबाबत माहिती दिली आहे.
हेही पहा – 
https://www.youtube.com/watch?v=B6cnYYURVI4
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.