Kalyan मध्ये जाळ्यात अडकलेल्या अतिविषारी घोणसला जीवदान

116
Kalyan मध्ये जाळ्यात अडकलेल्या अतिविषारी घोणसला जीवदान
वॉर फाऊंडेशनने घोणस सापाला जाळ्यातून मुक्त केले.
  • कल्याण : प्रतिनिधी

Kalyan : कल्याणच्या गौरीपाड्यात टाकून दिलेल्या मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या भारतातील अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या घोणस सापाला (Ghonas Snake) वॉर फाऊंडेशनच्या बचाव पथकाने सुखरूप जीवदान दिले. सापाच्या बचावासोबतच पथकाने घटनास्थळी स्थानिक रहिवाशांमध्ये कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत जनजागृतीही केली.

जाळ्यात साप अडकल्याची माहिती मिळताच वॉर फाऊंडेशनचे बचावकर्ते प्रेम आहेर आणि तन्मय माने यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. सापाला कोणतीही इजा न पोहोचवता, सुरक्षित पद्धतींचा वापर करून त्याला जाळ्यातून मुक्त करण्यात आले. सुटका केल्यानंतर सापाची वैद्यकीय व आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

(हेही वाचा – Ajinkya Rahane Retirement : ‘रहाणेला त्याच्या कामगिरीचं योग्य श्रेय मिळालं नाही,’ – सुनील गावसकर)

मानव/वन्यजीवांतील संघर्ष टाळा

सापाची सुटका केल्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळीच स्थानिक रहिवाशांसाठी जनजागृती सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये पथकाने रहिवाशांना मार्गदर्शन केले. मासेमारीची जाळी आणि प्लास्टिक कचरा (Plastic waste) उघड्यावर टाकल्याने वन्यजीवांच्या जीवाला होणारा गंभीर धोका. टाकून दिलेली जाळी साप, पक्षी आणि इतर प्राण्यांसाठी कशी जीवघेणी ठरतात याबद्दल माहिती दिली. पावसाळ्याच्या दिवसांत मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

​कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन

आपण उघड्यावर टाकलेल्या कचऱ्याचा थेट परिणाम वन्यजीवांच्या आयुष्यावर होतो. मासेमारीच्या जाळ्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासारखी साधी काळजी घेतली, तरी अनेक मुक्या प्राण्यांचे प्राण वाचू शकतात, असे मत बचाव पथकाने व्यक्त केले. ​वॉर फाऊंडेशनच्यावतीने सर्व रहिवाश्यांना वन्यजीव संवर्धनात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिसरात कुठेही साप आढळल्यास त्याला इजा न पोहोचवता प्रशिक्षित बचावकर्त्यांशी किंवा वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.