Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात ६.४१ कोटींचा ‘कागदी’ वेतन घोटाळा; १० बनावट कर्मचाऱ्यांच्या नावावर लाटले वेतन!

Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात ६.४१ कोटींचा 'कागदी' वेतन घोटाळा; १० बनावट कर्मचाऱ्यांच्या नावावर लाटले वेतन!

90
Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात ६.४१ कोटींचा 'कागदी' वेतन घोटाळा; १० बनावट कर्मचाऱ्यांच्या नावावर लाटले वेतन!
Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात ६.४१ कोटींचा 'कागदी' वेतन घोटाळा; १० बनावट कर्मचाऱ्यांच्या नावावर लाटले वेतन!
  • मुंबई

Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात एका खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. २०१९ ते २०२० या कालावधीत मुंबई पोलीस दलातील १० ‘कर्मचाऱ्यांना’ पगार म्हणून तब्बल ६ कोटी ४१ लाख रुपये देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, तब्बल सहा वर्षांनंतर झालेल्या चौकशीत या व्यक्ती केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचा बभ्रा झाला असून, या घबाडाने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विभागाच्या जुन्या ‘सेवार्थ सॅलरी पोर्टल’वरून नवीन सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये कर्मचारी डेटा स्थलांतरित करत असताना या महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला. या विशेष तपासणीत असे उघड झाले की, प्रत्यक्षात पोलीस खात्यात कार्यरत नसलेल्या १० व्यक्तींची नावे अधिकृत नोंदींमध्ये वारंवार कर्मचारी म्हणून दाखवली जात होती. विशेष म्हणजे, या बोगस नावांवर दरमहा वेतनाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात नियमितपणे जमा होत होती.

(हेही वाचा – १४ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! सीसीएमपी उत्तीर्ण Homeopathy डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी सुरु )

गुन्हे शाखेकडून तपास सुरू; पाच लिपिकांवर फसवणुकीचा गुन्हा

याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास हाती घेतला आहे. प्राथमिक तपासात पाच लिपिक कर्मचाऱ्यांवर फसवणूक, बनावटगिरी, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

अनधिकृत पगाराचे वितरण सुरळीतपणे सुलभ करण्यासाठी आरोपींनी चक्क बनावट सेवा ओळखपत्रे आणि निश्चित योगदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) ओळखपत्रे तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत विभागाने तात्काळ कारवाई करत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.