Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी घडामोड! सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी घडामोड! सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

97
Sharad Pawar NCP Removes All Spokespersons
Sharad Pawar NCP Removes All Spokespersons

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिक प्रभावीपणे पक्षाच्या प्रवक्ते पदासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावरून दिली.(Sharad Pawar NCP Removes All Spokespersons)

(हेही वाचा : काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर Sunetra Pawar यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वेळ आल्यावर….”)

पक्षाच्या सर्व प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत असल्याची मोठी घोषणा शशिकांत शिंदे यांनी केली आहे. यापुढील काळात पुढील आदेश येईपर्यंत नियुक्त्या बरखास्त करण्यात आल्यात. तर पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील. पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी”, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले आहे.(Sharad Pawar NCP Removes All Spokespersons)

सुनेत्रा पवारांवरील टीकेने राजकारण तापलं

शरद पवारांच्या पक्षातील प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त करण्याच्या वेळेची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. एकीकडे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणत बोचरी टीका केली आहे. या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.(Sharad Pawar NCP Removes All Spokespersons)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.