Kalyan – डोंबिवलीकरांनो सावधान! शहरात ‘स्वाइन फ्लू’चा शिरकाव; दोन रुग्ण आढळल्याने खळबळ

85
स्वाइन फ्लू विषाणूची सूक्ष्मदर्शक प्रतिमा
स्वाइन फ्लू विषाणूची सूक्ष्मदर्शक प्रतिमा.

प्रतिनिधी

स्वाईन फ्लूने (Swine Flu) शिरकाव केल्याच्या वृत्ताने कल्याण-डोंबिवलीत एकच खळबळ माजली आहे. कल्याण येथील एका खासगी रूग्णालयात स्वाईन फ्लूचे (Swine Flu) दोन रूग्ण आढळून आले आहेत. सध्या दोन्ही रूग्णांवर खासगी रूग्णालयात (Private hospital) उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. (Kalyan)

(हेही वाचा – Mumbai Crime : माटुंग्यात कंत्राटदारांवर चाकूने प्राणघातक हल्ला, सायन रुग्णालयात उपचार सुरू)

या दोन रूग्णांबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला खासगी रूग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसर्गजन्य आजाराबाबत त्वरित माहिती देणे बंधनकारक असतानाही रूग्णालयाने माहिती लपवून ठेवल्याचा आरोप आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

या घटनेनंतर केडीएमसी प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. संबंधित खासगी रूग्णालयाकडून तातडीने माहिती मागवण्यात आली असून रूग्ण राहत असलेल्या परिसरात आरोग्य पथकांमार्फत तपासणी आणि सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाईन फ्लू सारखे आजार डोके वर काढत असल्याने मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे आणि गर्दी टाळणे आवश्यक आहे. पावसाळ्यात दमट हवामानामुळे विषाणूंचा प्रसार झपाट्याने होतो. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. केडीएमसीच्या आरोग्य विभागाने पुढील ४८ तासांत सर्व खासगी रूग्णालयांकडून अहवाल मागवला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

(हेही वाचा – Court Establishment : चांदवडसह चार शहरात न्यायालयांची स्थापना )

केडीएमसीचे (KDMC) साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप मुकणे यांनी सांगितले की, मे महिन्यातच सर्व खासगी रूग्णालयांना परिपत्रक पाठविले आहे. एच – १ चे रूग्ण उपचारांसाठी आल्यास तात्काळ माहिती देण्याच्या सूचना वैद्यकीय आरोग्य विभागाने खासगी रूग्णालयांना दिल्या आहेत. कल्याणच्या खासगी रूग्णालयात असे दोन रूग्ण आढळून आले आहेत. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी ही या आजारांची लक्षणे आहेत. अशा बाधित रूग्णांनी तत्काळ केडीएमसीच्या आरोग्य केंद्र वा रूग्णालयात जाऊन तपासणी व उपचार घ्यावेत. वैद्यकीय आरोग्य विभाग त्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन डॉ. मुकणे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.