Sheikh Hasina पहिल्यांदा बांगलादेशीयांना उद्देशून भाषण देणार; बांगलादेशचे पंतप्रधान काय म्हणाले?

बांगलादेशच्या पंतप्रधानांना, नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

87

बुधवार, ५ ऑगस्ट रोजी, संपूर्ण जग बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि पदच्युत नेत्या शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्याकडे लक्ष ठेवून असेल. हसीना बांगलादेशसह संपूर्ण जगाला व्हर्च्युअली संबोधित करतील. या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील ‘फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साऊथ एशिया’तर्फे केले जाणार आहे. बांगलादेशने यावर आक्षेप घेतला आहे. बांगलादेशने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina)  किंवा कोणत्याही आवामी लीग नेत्याला किंवा व्यक्तीला राजकीय कारवायांसाठी किंवा बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भारतीय भूमीचा वापर करण्याची परवानगी दिली जाऊ नये.

परराष्ट्र मंत्रालयाने आता प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, तुम्ही ज्या कार्यक्रमाचा उल्लेख करत आहात, तो एका खाजगी माध्यम संस्थेद्वारे आयोजित केला जात आहे. यामध्ये भारत सरकारची कोणतीही भूमिका नाही. या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या कोणत्याही मतांना सरकारचा पाठिंबा नाही. परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिक्स शिखर परिषदेसंदर्भातही एक निवेदन जारी केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, भारताने बिमस्टेकच्या (BIMSTEC) विद्यमान अध्यक्ष असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधानांना, नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हे आमंत्रण सामान्य प्रक्रियेनुसार देण्यात आले आहे. इतर प्रादेशिक गटांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.  (Sheikh Hasina)

(हेही वाचा त्रिशापासून सनातनापर्यंत Udhayanidhi Stalin यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे केव्हा वाद उद्भवलेला? )

दरम्यान, बांगलादेश माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणाची सातत्याने मागणी करत आहे. आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना, बांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार, झहीद उर रहमान म्हणाले की, हसीना यांनी परत यावे आणि कायद्याचा आदर करावा. भारतात असताना त्यांनी कोणतीही राजकीय विधाने करू नयेत. या संदर्भात भारत सरकारला एक पत्र लिहिण्यात आले आहे. हा मुद्दा भारतीय उच्चायुक्तांकडेही मांडण्यात आला आहे. त्यांच्या मते, जर हसीना परत आल्या, तर त्यांना अटक केली जाईल आणि त्यांचे कायदेशीर हक्क बजावण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर न्यायालय निर्णय देईल. बांगलादेशकडून हे वक्तव्य ५ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या आधी आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.