Water Leakage : टिटवाळ्यातील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती

बेजबाबदारपणामुळे लाखो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय

85
Water Leakage : टिटवाळ्यातील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती
Water Leakage : टिटवाळ्यातील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती
  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) टिटवाळा (Titwala) येथील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष आणि देखभालीअभावी दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणीटंचाई, कमी दाबाने पाणीपुरवठा आणि वेळेवर पाणी न येण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्याच जलशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Water Leakage)

टिटवाळा येथील मोहिली जलशुद्धीकरण केंद्र हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथून शुद्ध केलेले पाणी कल्याण-डोंबिवलीसह (Kalyan-Dombivli) आसपासच्या परिसरातील अनेक भागांना पुरवले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या केंद्रातील पाईपलाईनमधील गळती, तांत्रिक बिघाड आणि ओव्हरफ्लो टाक्यांमधून होणारी गळती यामुळे दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी केला आहे. केंद्र परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले दिसून येत आहे. (Water Leakage)

(हेही वाचा – KDMT च्या बसगाड्यांची दुरावस्था; खिडक्यांना काचा नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात)

विशेष म्हणजे उन्हाळ्यात पाणीटंचाई (Water shortage) अधिक तीव्र होते. कल्याणच्या पूर्व-पश्चिम, तसेच डोंबिवलीतील पूर्व-पश्चिम भागात आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा (Water supply) होतो. अनेक ठिकाणी नागरिकांना विकतचे पाणी घेऊन भागवावे लागत आहे. अशा परिस्थितीत शुद्धीकरण केंद्रातच पाण्याचा एवढा मोठा अपव्यय होत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. (Water Leakage)

जर ही नासाडी रोखली गेली तर किमान काही भागांना अतिरिक्त पाणीपुरवठा करता येऊ शकतो. महापालिकेने तातडीने तांत्रिक तपासणी करून गळती दुरुस्त करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा या विषयावर आंदोलन करण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे. पाणी ही मूलभूत गरज असताना एकीकडे नागरिक तहानलेले आणि दुसरीकडे शुद्ध पाणी वाया जाणे हे चित्र कल्याण-डोंबिवलीकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. महापालिका प्रशासन या गंभीर प्रकाराकडे कधी लक्ष देणार ? नासाडी कधी थांबवणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Water Leakage)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.