Punjab: दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, ‘आयएसआय’शी चार अल्पवयीनांसह ९ जणांना अटक

124
Punjab: दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 'आयएसआय'शी चार अल्पवयीनांसह ९ जणांना अटक
Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात १ दहशतवादी ठार, चममक सुरूच

Punjab: पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा मोठा कट पंजाब पोलिसांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI च्या इशाऱ्यावर काम करत असल्याच्या आरोपाखाली चार अल्पवयीन मुलांसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या कारवाईत तीन बेकायदेशीर पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे आणि पेट्रोल बॉम्ब तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलच्या चार बाटल्या जप्त केल्या आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हे सर्व संशयित परदेशातील आयएसआयच्या हँड्लर्सच्या संपर्कात होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत होते. या तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षित केले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पंजाबमधील सुरक्षा यंत्रणांवर पाळत ठेवणे, बेकायदेशीर शस्त्रे जमा करणे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणे ही जबाबदारी या संशयितांवर सोपवण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपींनी सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली टिपण्यासाठी आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे रुळांच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा – Balochistan Independence Day : बलुचिस्तानने ११ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून केला जाहीर, जागतिक मान्यतेसाठी आवाहन

सध्या पोलीस या नेटवर्कमधील अन्य फरार सदस्यांचा शोध घेत असून त्यांच्या परदेशी कनेक्शनची सखोल चौकशी करत आहेत. पुढील तपासादरम्यान आणखी अनेक महत्त्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देशभरातील संबंधित सुरक्षा यंत्रणांनाही देण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.