Jammu Kashmir Alert : दहशतवाद्यांकडून वाढत्या ‘टारगेट किलींग’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेत मोठी वाढ

स्वातंत्र्यदिनाच्या आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे

102
Jammu Kashmir High Alert
'टारगेट किलींग'च्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेत मोठी वाढ

Jammu Kashmir High Alert : जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडील टार्गेट किलिंगच्या (Target Killing) वाढत्या घटनांनंतर, सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. अलीकडेच कुलगाम जिल्ह्यात दोन स्थलांतरित मजुरांची हत्या झाल्यानंतर आणि त्यापूर्वी काही दिवसांत एका पोलिस कर्मचाऱ्यासह अन्य नागरिकांच्या हत्येच्या घटनांमुळे दहशतवाद्यांविरोधात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीनगर, लाल चौक, दक्षिण काश्मीर तसेच इतर संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि धार्मिक स्थळांवर नाकाबंदी, वाहन तपासणी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. (Jammu Kashmir High Alert)

हेही वाचा: India Pakistan Border : स्वातंत्र्यदिनापूर्वी भारत-पाक सीमेवर खळबळ; जवानांनी उधळला पाकिस्तानचा कट

उपलब्ध माहितीनुसार, अलीकडील ‘टार्गेट किलिंगच्या’ घटनांमागील दहशतवादी नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलिस, लष्कर आणि केंद्रीय सुरक्षा दल संयुक्तपणे कारवाई करत आहेत. विविध भागांत कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन (CASO) राबवण्यात येत असून, संशयितांच्या हालचालींवर तांत्रिक आणि मानवी गुप्तचर यंत्रणांमार्फत लक्ष ठेवले जात आहे.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाते. यंदाही अमरनाथ यात्रेमुळे सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त जबाबदारी आली आहे. यात्रेचा मार्ग, बेस कॅम्प, श्रीनगर शहर आणि संवेदनशील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांची संख्या वाढवण्यात आली असून, ड्रोनद्वारे देखरेख आणि सीसीटीव्ही निरीक्षणालाही प्राधान्य दिले जात आहे. (Jammu Kashmir High Alert)

हेही वाचा: Mumbai Disease : मुंबईकरांनो सावधान! शहरात मलेरिया, ड्येंगूचे थैमान; रुग्णांची आकडेवारी चिंताजनक

टार्गेट किलिंग म्हणजे काय?

टार्गेट किलिंग (Target Killing) म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा गटातील व्यक्तीला पूर्वनियोजित कट रचून मुद्दाम लक्ष्य करून ठार मारणे. अशा हल्ल्यांमध्ये हल्लेखोरांचा उद्देश कोणताही सर्वसामान्य नागरिक नसून ठरावीक व्यक्ती किंवा विशिष्ट गटातील व्यक्ती असते. यामध्ये पोलीस किंवा सुरक्षा दलाचे कर्मचारी, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, विशिष्ट समुदायातील नागरिक, स्थलांतरित (परराज्यातील) कामगार किंवा एखाद्या विशिष्ट व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना लक्ष्य केले जाऊ शकते. अशा प्रकारच्या हत्या भीतीचे वातावरण निर्माण करणे, सुरक्षा यंत्रणांना आव्हान देणे किंवा विशिष्ट संदेश देण्याच्या उद्देशाने केल्या जातात. (Jammu Kashmir High Alert)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.