Dombivli Doctor Attack Case : मुख्य आरोपी रमेश म्हात्रेंच्या न्यायालयीन कोठडीत १५ दिवसांची वाढ

75
Shastrinagar Hospital प्रकरण: रमेश म्हात्रेंना जामीन; महिला डॉक्टरांच्या वडिलांची प्रतिक्रिया
Shastrinagar Hospital प्रकरण: रमेश म्हात्रेंना जामीन; महिला डॉक्टरांच्या वडिलांची प्रतिक्रिया
  • कल्याण : प्रतिनिधी

Dombivli Doctor Attack Case : डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात (Shastrinagar Hospital Dombivli) घडलेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांच्या न्यायालयीन कोठडीत कल्याण न्यायालयाने (Kalyan Court) १५ दिवसांची वाढ केली आहे. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रमेश म्हात्रे यांचा जबाब न्यायालयात नोंदविण्यात आल्यानंतर त्यांना पुढील १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोमवारी ६ जुलैच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका गर्भवती महिलेच्या उपचारावरून झालेल्या वादातून शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे खासगी अंगरक्षक असलेले रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे अशा चौघांनी मिळून मारहाण केली होती. डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून सद्या ते आधारवाडी कारागृहात आहेत.

(हेही वाचा – Palghar Flood : पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर)

पोलिसांनी रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून ते न्यायालयीन कोठडीत अर्थात आधारवाडी कारागृहात आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपी रमेश म्हात्रे यांचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवून घेतला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हात्रे यांची कोठडी आणखी १५ दिवसांनी वाढविली. त्यामुळे रमेश म्हात्रे यांचा पुढील १५ दिवसांचा मुक्काम आधारवाडी कारागृहात राहणार आहे.

दरम्यान या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेवर हल्ले वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी वैद्यकीय संघटनांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा चौकस तपास सुरू आहे. रूग्णालयातील घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजची न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.