१२ दिवसांपासून Malshej Ghat बंद; पर्यायी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवाशांचा संताप!

१२ दिवसांपासून Malshej Ghat बंद; पर्यायी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवाशांचा संताप!

265
Malshej Ghat Closed: Massive Potholes on Alternate Route
Malshej Ghat Closed: Massive Potholes on Alternate Route

पावसाळ्यात पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या माळशेज घाटातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची आणि स्थानिक नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे. माळशेज घाटातील करंजाळे परिसरामध्ये रस्ता खचल्यामुळे सुरक्षा आणि दुरुस्तीच्या कारणास्तव घाट मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. घाटातील रस्ता बंद झाल्यामुळे प्रशासनाने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. मात्र, या पर्यायी मार्गाची झालेली अत्यंत दुरावस्था आता वाहनचालकांसाठी आणि पर्यटकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.(Malshej Ghat Closed)

(हेही वाचा: भिवंडी इमारत दुर्घटनेतील ‘हिरो’ ठरला खड्ड्यांचा बळी! मुंबई-नाशिक महामार्गावर TDRF जवानाचा अपघाती मृत्यू)

माळशेज घाट मागील बारा दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असल्याने पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांना खिरेश्वर–पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरलगत असलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. मात्र या पर्यायी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे आणि खोल खड्डे पडले आहेत. गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे या रस्त्याचीही चाळण झाली आहे. या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक ठरत असून प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.(Malshej Ghat Closed)

(हेही वाचा: Satara DCC Bank Election : एका मतासाठी दोन लाखांची बोली; जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान नेमकं काय घडलं?)

धरणाच्या बॅकवॉटरलगतचा हा रस्ता आधीच अरुंद असून त्यावर खड्डे पडल्याने वाहने चालवताना चालकांची मोठी कसरत होत आहे. तसेच गाड्यांचे मोठे नुकसान होत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे वाहनचालक कमालीचे हैराण झाले आहेत. पर्यायी मार्गाची झालेली दुरवस्था चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असून स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी आहे.(Malshej Ghat Closed)

हेही पाहा :
https://youtu.be/jYj56miGAiI

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.