“दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला असता…”; इराणसोबतच्या वाटाघाटीदरम्यान Donald Trump यांचं मोठं विधान!

"दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला असता..."; इराणसोबतच्या वाटाघाटीदरम्यान Donald Trump यांचं मोठं विधान!

109
Donald Trump यांच्या गोल्फ कोर्सवर संशयिताला अटक; शस्त्रे आणि दारुगोळा जप्त
Donald Trump यांच्या गोल्फ कोर्सवर संशयिताला अटक; शस्त्रे आणि दारुगोळा जप्त

Donald Trump US Iran Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा उफाळलेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी करारावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणसोबत आजपासून चर्चा सुरू होईल, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच ट्रम्प यांनी यावेळी बोलताना इराणवर भीषण हल्ला करण्याचा विचार केला होता, मात्र सौदीच्या मध्यस्थीनंतर ही कारवाई स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले. विमानप्रवासादरम्यान ते वार्ताहरांशी संवाद साधत होते.(Donald Trump US Iran Talks)

(हेही वाचा:  Taslima Nasrin म्हणाल्या,”मदरसे बनलेत जिहाद्यांचा कारखाना…”)

संघर्षाऐवजी संवादाला प्राधान्य

डोनाल्ड ट्रम्प यांनी एअर फोर्स वनमध्ये असताना पत्रकारांशी संवाद साधला. “हा हल्ला दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला असता आणि इराणसाठी तो विनाशकारी ठरला असता”, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि इराण यांच्या विनंतीवरून ही कारवाई टाळण्यात आल्याचं ट्रम्प यांनी सांगितले. पुढे बोलताना इराणबरोबर आजपासून पुन्हा चर्चा सुरु होणार असल्याचे तसेच करारासाठी मुदत निश्चित करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघर्षाऐवजी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याला आपलं प्राधान्य असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे. “इराणबरोबर वाटाघाटी सुरु आहेत. सोमवारी दुपारी चर्चा सुरु होईल, आणि पुढे बघूयात गोष्टी कशा जातात”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.(Donald Trump US Iran Talks)

(हेही वाचा: Gold Rate Today : खुशखबर! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याची घसरण; जाणून घ्या आजचे दर)

दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला करणार होतो

इराणबरोबर होणाऱ्या चर्चेबाबत ट्रम्प यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही. मात्र, चर्चा सकारात्मक होईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. चर्चेबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला आवडेल तसं करायला. अनेक लोकांचा जीव वाचेल.” हल्ल्याची भीषणता सांगताना, “विध्वंस एवढा भीषण असता की त्यांना पुन्हा सगळं उभं करायला खूप वर्ष लागतील”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. “इराणला आम्ही असं करावं असं वाटत नाही”, असेही ट्रम्प पुढे म्हणाले.(Donald Trump US Iran Talks)

सौदीच्या मध्यस्थीनंतर चर्चा

अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा व्हावी यासाठी सौदी अरेबियाने मध्यस्थी करत चर्चेला प्राधान्य देण्याचा आग्रह केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. करारासाठी मुदतीवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आमचा भर करार करण्यावर आहे. मला आणखी लोकांना मारायचं नाही, कारण खूप लोकं मरतात आणि मला ते नको आहे.”(Donald Trump US Iran Talks)

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर देखील इराणसोबत करारासाठी मध्यपूर्वेतील देशांनी विनंती केल्यानंतर लष्करी कारवाई तुर्तास स्थगित केल्याची  पोस्ट केली आहे. यात त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा आग्रह देखील धरला केला आहे. अण्वस्त्र निर्मितीचा मुद्दा उपस्थित करत ट्रम्प यांनी इराणने लवकरात लवकर करार करावा असे स्पष्ट केले आहे.(Donald Trump US Iran Talks)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.