- कल्याण : प्रतिनिधी
Crime : डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडे असलेल्या के. व्ही. पेंढरकर कॉलेजजवळ (K.V.Pendharkar College) विद्यार्थ्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल हिसकावून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
(हेही वाचा – Anil Ambani यांचा आणखी एक कारनामा; एलआयसी, सरकारी, खाजगी बँकांनंतर आता EPFO लाही लावले धंद्याला)
या संदर्भात पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास के. व्ही. पेंढरकर कॉलेज समोरील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. मुंबईच्या गोवंडी येथील रहिवासी असलेल्या वृषभ लक्ष्मण जाधव (१९) या विद्यार्थ्याने या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. वृषभ हा त्याच्या आतेभावा सोबत तेथील एका हॉटेलमधून ऑनलाईनद्वारे जेवण घेऊन गाडीजवळ आला. इतक्यात अचानक काळ्या आणि सिल्वर रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या इसमाने मागून येऊन वृषभच्या गळ्यातील सोन्याची चेन (Gold chain) ओढून काढली. तसेच हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. सार्वजनिक रस्त्यावर हा सारा प्रकार घडला. मध्यरात्रीचा सुमार असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. वृषभ आणि त्याच्या आतेभावाने आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत लुटारू त्याच्या दुचाकीवरून दूर निघून गेला होता. या प्रकरणी वृषभने दिलेल्या फिर्यादीनुसार मानपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप रहाटे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

