Beed News : MPSC चा टॉपर ते मोठा लाचखोर! तब्बल ४५ लाखांची लाच घेताना ACBच्या सापळ्यात; नेमकं प्रकरण काय?

Beed News : MPSC चा टॉपर ते मोठा लाचखोर! तब्बल ४५ लाखांची लाच घेताना ACBच्या सापळ्यात; नेमकं प्रकरण काय?

113
MPSC Topper Srinivas Lakhamawad Arrested by ACB
MPSC Topper Srinivas Lakhamawad Arrested by ACB


२०१६ च्या MPSC परीक्षेतील अव्वल क्रमांकाचे अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना बीडमध्ये ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली. वृक्षलागवड निधी, वेतनवाढ आणि प्रशासकीय कामांमध्ये सहकार्य करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. विशेष म्हणजे लाच घेण्याआधी हा अधिकारी उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होता. पालकमंत्र्यांची बैठक आटोपून घरी गेल्यानंतर घरात लाचेची रक्कम स्वीकारताना हा लाचखोर अधिकारी जाळ्यात अडकला.(MPSC Topper Srinivas Lakhamawad Arrested by ACB)

(हेही वाचा : Maharashtra Freedom of Religion Act : राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! बळजबरीने धर्मांतराला आळा बसणार; काय आहेत तरतुदी?)

नेमकं प्रकरण काय?

सरकारकडून २०२५-२६ या वर्षासाठी बीड जिल्ह्याला वृक्ष लागवडीसाठी एकूण ३ कोटी ७५ लाखांचा निधी मिळाला. निधी वितरणासाठी आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची प्रलंबित वेतनवाढ देण्यासाठी लखमावाडने १२ टक्के कमिशन मागितले. लखमावाडचा महिन्याचा पगार दीड लाख असताना त्याने ३० पट म्हणजे तब्बल ४५ लाखांची लाच मागितली. सुरुवातीला संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने लाच देण्यास नकार दिला होता. पण लखमवाडने सूडबुद्धीने अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखली, निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला.(MPSC Topper Srinivas Lakhamawad Arrested by ACB)

(हेही वाचा : Ceuta Migration Crisis : युरोपमध्ये खळबळ! ६० हजार स्थलांतरितांच्या घुसखोरीनंतर EU ची ५ ऑगस्टला आणीबाणीची बैठक)

अखेर वैतागलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. लखमावाड यांनी तक्रारदाराला आपल्या घरी बोलावलं. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर चेहऱ्यावरून रुमाल फिरवून संकेत दिला आणि बाहेर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तात्काळ धाड टाकत ४५ लाख रुपयांच्या रोख रकमेसह श्रीनिवास लखमावाड यांना रंगेहात अटक केली.ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने केली.(MPSC Topper Srinivas Lakhamawad Arrested by ACB)

(हेही वाचा : Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातविरोधात ईडीने फास आवळला! कोर्टात सादर केले नवे पुरावे)

MPSC ‘टॉपर’ ते लाचखोर

श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड हे मूळचे नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे,  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेते ते राज्यातून अनुसूचित जमातीतून प्रथम आले आहेत. दहावीपर्यंत नांदेडमध्ये शिकल्यानंतर पुढे त्यांनी बी.टेकपर्यंतचं शिक्षण घेतलं. सामाजिक वनीकरण विभागात लखमवाड विभागीय वन अधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात काम करत होते.(MPSC Topper Srinivas Lakhamawad Arrested by ACB)

(हेही वाचा : )

प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक इथे त्यांची बेनामी मालमत्ता असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने ACB कडून अधिक तपास सुरू असून त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. अगोदरच राजकीय गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा चर्चेत आहेत, अशातच भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामुळे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चर्चाही सुरू झाली आहे.(MPSC Topper Srinivas Lakhamawad Arrested by ACB)

हेही पाहा :

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.