Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत, नवा इतिहास रचला. एका दिवसात तब्बल 16 पदकांची कमाई करत खेळाडूंनी स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यामध्ये सर्वाधिक चमक बॉक्सिंगपटूंनी दाखवली. भारताने बॉक्सिंगमध्ये 10 पैकी 10 पदके जिंकली असून; ज्यापैकी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके आहेत. दुसरीकडे ॲथलेटिक्स, पॅरा ॲथलेटिक्स, ट्रिपल जंप आणि ज्युडोमधील पदकांमुळे भारताची एकूण पदकसंख्या 39 (13 सुवर्ण, 17 रौप्य, 9 कांस्य) वर पोहोचली आणि पदकतक्त्यात भारताने थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली.
बॉक्सिंगमध्ये भारताची दमदार खेळी
दहाव्या दिवसाचा सर्वात मोठा आकर्षण ठरले ते भारतीय बॉक्सर. भारताचे 10 बॉक्सर अंतिम फेरीत उतरले आणि सर्वांनी पदक निश्चित केले. त्यापैकी सात जणांनी सुवर्ण, तर तीन जणांनी रौप्य पटकावत राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचा सर्वोत्तम बॉक्सिंग दिवस नोंदवला. (Commonwealth Games 2026)
सुवर्णपदक विजेते
- प्रीती पवार – महिला 54 किलो
- जॅस्मिन लांबोरिया – महिला 57 किलो
- साक्षी चौधरी – महिला 51 किलो
- प्रिया घनघस – महिला 60 किलो
- अरुंधती चौधरी – महिला 70 किलो
- सचिन सिवाच – पुरुष 60 किलो
- अंकुश – पुरुष 90+ किलो (सुपर हेवीवेट)
रौप्यपदक विजेते
भारताच्या खात्यात बॉक्सिंगमध्ये आणखी तीन रौप्यपदके जमा झाली. त्यामुळे या स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमधून एकूण 10 पदके (7 सुवर्ण, 3 रौप्य) जिंकत वर्चस्व सिद्ध केले. (Commonwealth Games 2026)
पुरुष 60 किलो गटाच्या अंतिम सामन्यात सचिन सिवाचचा सामना झांबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग न्देवेलो याच्याशी झाला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडलेल्या सचिनने अखेरच्या फेरीत दमदार पुनरागमन केले. पंचांनी 3-2 अशा विभाजित निर्णयाने सचिनला विजयी घोषित केले आणि त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
दुसरीकडे, महिला 70 किलो गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या अरुंधती चौधरीची कामगिरी विशेष ठरली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थीतींना तोंड देत, लढत-झगडत, मेहनतीच्या जोरावर अरुंधतीने राष्ट्रकुल स्पर्धेचा टप्पा गाठला आणि अखेर सुवर्ण पदक जिंकून एक नवा इतिहास रचला. (Commonwealth Games 2026)
ॲथलेटिक्समध्येही भारताची छाप
बॉक्सिंगव्यतिरिक्त ॲथलेटिक्समध्येही भारताने दमदार कामगिरी केली. गुलवीर सिंगने लांब पल्ल्याच्या स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले. ट्रिपल जंपमध्ये भारताने दुहेरी पदक पटकावले. पॅरा अॅथलेटिक्समध्येही भारतीय खेळाडूंनी डबल पोडियम फिनिश साधत भारताच्या पदकसंख्येत मोलाची भर घातली.
ज्युडोमध्येही ऐतिहासिक कामगिरी
ज्युडोमध्ये उन्नती शर्माने कांस्यपदक जिंकत भारताच्या पदकांमध्ये आणखी एक भर घातली. तर, आधीच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी आपल्या गटात सुवर्णपदके जिंकत भारताला एकाच दिवशी दोन सुवर्णपदकांची ऐतिहासिक कमाई करून दिली. (Commonwealth Games 2026)
महिलांच्या ४८ किलो वजनी गटात अस्मिता डे हिने अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर मात करत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला जुडोपटू ठरली. तर, पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात हर्ष सिंहने ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी आणि ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या जोशुआ कॅट्झचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे तो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ज्युदोपटू ठरला. (Commonwealth Games 2026)
हेही वाचा: राज्याला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी; Central Govt कडून कर वितरण
एका दिवसात 16 पदकांची कमाई
दहाव्या दिवसातील भारताची 16 पदकांची कमाई अशी होती—
- बॉक्सिंग – 10 पदके (7 सुवर्ण, 3 रौप्य)
- ॲथलेटिक्स – महत्त्वाची पदके
- ट्रिपल जंप – दुहेरी पदक
- पॅरा ॲथलेटिक्स – दुहेरी पदक
- ज्युडो – 1 कांस्य (Commonwealth Games 2026)
या दमदार कामगिरीमुळे भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील एकूण पदकसंख्या 39 वर पोहोचली आहे. (Commonwealth Games 2026)
पदकांची संख्या
दिवसअखेर भारताच्या खात्यात:
- सुवर्ण – 13
- रौप्य – 17
- कांस्य – 9
- एकूण – 39 पदकांची भर पडली आहे.
या दमदार कामगिरीमुळे भारताने पदकतक्त्यात सहा स्थानांची झेप घेत चौथे स्थान पटकावले. अंतिम दिवसात आणखी पदकांची आशा कायम असून भारतीय पथकाकडून ही स्पर्धा विक्रमी पदकसंख्येसह संपवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Commonwealth Games 2026)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


