श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा २०२६ सन्मान शिवसमिधांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजन करण्यात आले होते. दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष, ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक रणजित सावरकर उपस्थित होते, यावेळी श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समितीचे प्रमुख सुनील पवार हेही उपस्थित होते. तर शेवटच्या सत्रात रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे मंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित होते. त्यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. (Chhatrapati Shivaji Maharaj)

मी आमदार असेन नसेन , मंत्री असेन नसेन पण श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने आयोजित श्री शिवराज्याभिषक दिनाला कायम सहकार्य करत असेन. शिवभक्त म्हणून आमची ही जबाबदारी आहे. जर तुम्ही नि:स्वार्थीपणे काम करता तेव्हा लोक निश्चित तुमच्यासोबत येतात. कोणतेही भेदाभेद न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी (Chhatrapati Shivaji Maharaj) एकत्र कार्य करावे. त्यासाठी सर्व सहकार्य आम्ही करू. महाराज नसते तर आपल्या सर्वांची काय अवस्था झाली असती? या आपल्या भावी पिढीने हा कार्यक्रम असाच सुरु ठेवावा. महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याचा इतिहास आमच्या सरकारने पाठक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. जन्माला आल्यावर एकदातरी पंढरीची वारी करावे असे म्हणतात, तसे एकदा तरी रायगडाला येऊन राजाला वंदन करावे.
– भरतशेठ गोगावले, मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास.
(हेही वाचा POK मधील हिंसाचार पोहचला लाहोरपर्यंत; पोलिसांनी आंदोलकांवर केली कारवाई)

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात चिमुकल्या मुलांनी तलवार, भाला, पट्टा, लाठी, बोथाटी, विटा इत्यादी शस्त्रास्त्रे सराईतपणे चालवून त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यांचे हे शस्त्रास्त्रांचे मर्दानी खेळ पाहून उपस्थित सर्व जण भारावून गेले. इतिहास हा केवळ पुस्तकांच्या पानांत बंदिस्त राहण्यासाठी नसतो, तो पिढ्यान् पिढ्या प्रेरणा देण्यासाठी असतो, तो रक्तात सळसळला पाहिजे, मनात धगधगला पाहिजे आणि कानावर पडणाऱ्या प्रत्येक रणभेरीच्या निनादासोबत पुन्हा एकदा जिवंत झाला पाहिजे.

(हेही वाचा जगात आणखी एक देश पेटला; Supreme Court च्या निर्णयानंतर तब्बल ५७ जणांचा झाला मृत्यू)
जेव्हा इतिहासाला शब्दांची तलवार, सुरांची धार आणि पराक्रमाची गर्जना लाभते, तेव्हा जन्म होतो महाराष्ट्राच्या अभिमानाच्या लोककलेचा-पोवाड्याचा! प्रत्येक मराठी मनात शिवभक्तीची (Chhatrapati Shivaji Maharaj) चेतना जागवणारा अमर स्वर! स्वराज्याच्या इतिहासातील पराक्रम, त्याग आणि प्रेरणेचे क्षण आपल्या बुलंद आवाजातून जिवंत करणारे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे समर्पित सदस्य, सुप्रसिद्ध शाहीर प्रवीण फणसे आणि त्यांची संपूर्ण टीमने शाहिरी साजऱ्या करून उपस्थितीतांमध्ये शिवतेज जागृत केले. मयूर उबाळे यांनी संबळ वादन केले.

आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६वी जयंती आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट प्रात्यक्षिके ठेवली आहे, यामागे योग आहे हे तुमचेच कर्तव्य आहे. दुबळ्या मनगटाने शाहिरी केल्या जात नाही. ज्याचे मनगट समर्थ असेल तोच शाहिरी करू शकतो. शाहिरी हे वीरांचे गुणगान असते. आज जी तुम्ही परंपरा दाखवली याचा आम्हाला अभिमान आहे. या पारंपरिक युद्ध कला शिकवण्यासाठी सावरकर स्मारक सहकार्य करेल. छत्रपतींनी (Chhatrapati Shivaji Maharaj) आपल्याला एक विचार करायला शिकवले. आज जे तरुण इथे उपस्थित आहेत, त्यांना मी जेन झी म्हणणार नाही. कारण जेन झी म्हणजे एआय चे ऐकणारे जेन झी. दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारे जेन झी. आज तुम्ही स्वतःच्या बुद्धीचे वागता कारण तुम्ही काही तरी करत आहात. हे जे पारंपरिक वीरश्री शिकवणारे खेळ आहेत, त्यासाठी लागणारे कौशल्य तुम्ही आत्मसात केले, त्यामुळे तुमच्या बुद्धीवर कुणीही अंकुश आणू शकणार नाही. यासोबत आधुनिक शस्त्रास्त्रे शिकली पाहिजेत.
– रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.

(हेही वाचा जगात आणखी एक देश पेटला; Supreme Court च्या निर्णयानंतर तब्बल ५७ जणांचा झाला मृत्यू)
शिवकाळात शत्रूच्या समोर गुप्तपणे दुरुन सांकेतिक भाषेत संदेश देण्याची भाषा म्हणजे करपल्लवी ही सांकेतिक भाषा. त्या सांकेतिक भाषेची प्रात्यक्षिके सोमाजी वागसे, संजय जाधव आणि मंचिकर यांनी सादर केली. यावेळी ज्येष्ठ तुतारी वादक लक्ष्मण गुरव यांचा सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात सहभाग घेतलेल्या मावळ्यांचा-शिवभक्तांच्या सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांचाही आवर्जून सत्कार करण्यात आला. (Chhatrapati Shivaji Maharaj)

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. ज्यावेळी इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतो आणि ज्यावेळी भूगोल बोलत नाही त्यावेळी विज्ञान बोलते. महाराजांनी ५०० लढाया केल्या, त्या सर्व लढाया वेगवेगळ्या पद्धतीच्या युद्धशास्त्राचे नमुने होते. त्यांचा अभ्यास कुणी करत नाही. त्या युद्धनीतीमध्ये विज्ञान आहे. त्याचा अभ्यास शालेय अभ्यासक्रमातून झाला पाहिजे.
– आप्पा परब, ज्येष्ठ इतिहास संशोधक.

अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान, महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांनी जो पराक्रम गाजवला, त्यावेळी त्यांच्या काळात जसे मावळे होते, त्यांचा आदर्श आजच्या तरुणपिढीसमोर असावा म्हणून दरवर्षी रायगडावर तिथीप्रमाणे श्री शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. त्या कर्यक्रमानंतर ज्या ज्या मावळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्या सर्व मावळे, संस्था, कलाकार यांचा सत्कार करणे हे समितीचे कर्तव्य आहे. म्हणून श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने हा असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. महाराजांच्या काळात हिंदू धर्मावर संकट होते, त्यात छत्रपती संभाजी महाराज आमचे गेले, तिच परिस्थिती आज काही घटक निर्माण करू पाहत आहेत. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी तरुणांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यासाठी कट्टर मावळे तयार करण्याचे काम आम्ही करत असतो.
– सुनील पवार, प्रमुख, श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जो राज्याभिषेक झाला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जसे आपण आपल्या महापुरुषांचे, राष्ट्रपुरुषांचे स्मरण करत असतो, कारण आजच्या तरुण पिढीला त्या महनीय प्रभुतींनी केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे, त्याच उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जसे आपण श्रीरामाची रामनवमी करतो, श्रीकृष्णाचे कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. त्याप्रमाणे राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करणे हा आदर्श आजच्या पिढीने जपावा, हेच यामागील उद्दिष्ट आहे.
– राजेंद्र वराडकर, कार्यवाह, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.


