US Iran War : ट्रम्प यांचा मोठा निर्णय? सैन्याला सज्जतेचे आदेश, कधीही होऊ शकतो इराणवर हल्ला?

US Iran War : ट्रम्प यांचा मोठा निर्णय? सैन्याला सज्जतेचे आदेश, कधीही होऊ शकतो इराणवर हल्ला?

89
US Iran War : ट्रम्प यांचा मोठा निर्णय? सैन्याला सज्जतेचे आदेश, कधीही होऊ शकतो इराणवर हल्ला?
US Iran War : ट्रम्प यांचा मोठा निर्णय? सैन्याला सज्जतेचे आदेश, कधीही होऊ शकतो इराणवर हल्ला?
  • ऋजुता लुकतुके

अमेरिका आणि इराण(US Iran War)यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्याच्या अखेरीस इराणवर नव्या लष्करी कारवाईचे आदेश दिल्याचे वृत्त समोर आले आहे. हा दावा वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालात करण्यात आला आहे. या संभाव्य कारवाईमुळे पश्चिम आशियातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रम्प यांनी कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमेरिकन लष्कराला इराणविरुद्ध नव्या हवाई हल्ल्याची तयारी करण्याचे निर्देश दिले. हा हल्ला या आठवड्याच्या शेवटी सुरू होऊ शकतो आणि अनेक दिवस चालू राहू शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

ट्रम्प यांनी बैठकीत इराणवर कठोर शब्दांत टीका करत “आम्ही त्यांना खूप जोरदार फटका देणार आहोत” असे वक्तव्य केले. अमेरिकेच्या मते, इराणने जॉर्डनमधील अमेरिकन तळावर झालेल्या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अहवालानुसार, अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यात इराणची ऊर्जा पायाभूत सुविधा, तेल शुद्धीकरण प्रकल्प, वीज निर्मिती केंद्रे आणि लष्करी तळ लक्ष्य होऊ शकतात. अशा प्रकारची कारवाई झाल्यास हा संघर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी टप्पा ठरू शकतो.

(हेही वाचा – Saffron Jersey Row : हॉकी संघाच्या भगव्या जर्सीमुळे झालेला वाद चिघळला, हॉकी इंडियाने उचलली पावलं )

मात्र अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (Pentagon) या कारवाईबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. अंतिम निर्णय परिस्थितीतील बदल आणि संभाव्य राजनैतिक घडामोडींवर अवलंबून असेल, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.

दरम्यान, इराणने अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याचा निषेध करत कोणतीही लष्करी कारवाई झाली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. या घडामोडींमुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक, जागतिक तेलपुरवठा आणि पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थिती याबाबत चिंता वाढली आहे.

या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली. विश्लेषकांच्या मते, इराणच्या ऊर्जा सुविधांवर हल्ला झाल्यास जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते.

ट्रम्प प्रशासनाने इराणवर दबाव वाढवण्यासाठी लष्करी पर्यायाचा विचार सुरू केल्याचे संकेत या अहवालातून मिळत आहेत. मात्र प्रत्यक्ष कारवाई कधी आणि कोणत्या स्वरूपात होणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.