Barvi Dam ८३.७४ टक्के भरले; ओव्हरफ्लोला अवघे १.९० मीटर शिल्लक

Barvi Dam ८३.७४ टक्के भरले; ओव्हरफ्लोला अवघे १.९० मीटर शिल्लक

185
Barvi Dam ८४.५७ टक्क्यांवर; गेल्या वर्षीपेक्षा १० टक्क्यांनी तूट
Barvi Dam ८४.५७ टक्क्यांवर; गेल्या वर्षीपेक्षा १० टक्क्यांनी तूट
कल्याण : प्रतिनिधी

पावसाने जोर धरताच कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या जीवनवाहिनी असलेल्या बारवी धरणाने(Barvi Dam)वेग घेतला आहे. शनिवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी ७०.७० मीटरवर पोहोचली असून धरण ८३.७४ टक्के भरले आहे.(Barvi Dam)

धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. म्हणजेच ओव्हरफ्लो होण्यासाठी आता अवघे १.९० मीटर पाणी शिल्लक आहे. सध्या धरणात २८३.७५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या २४ तासांत १९.८० मिलीमीटर पाऊस झाला असून यंदाच्या मोसमातील एकूण पाऊस १९६४.६० मिलीमीटर झाला आहे. तुलना केली असता गेल्या वर्षी १ ऑगस्ट २०२५ रोजी धरण ९३.९६ टक्के भरले होते. त्यावेळी पाण्याची पातळी ७२.०१ मीटर आणि पाणीसाठा ३१८.३७ दशलक्ष घनमीटर होता. एकूण पाऊस १९४७.०० मिलीमीटर होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १० टक्क्यांनी पाणी कमी असले तरी पावसाचे प्रमाण मात्र अधिक आहे.(Barvi Dam)

(हेही वाचा – August School Holiday 2026 : ऑगस्टमध्ये मुलांची मज्जाच मज्जा, पालकांनाही मिळणार रिलॅक्स टाईम! पाहा शाळेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी )

पाणी टंचाईचा प्रश्न निकाली

हवामान विभागाने पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बारवी धरण लवकरच ओव्हरफ्लो होऊन उल्हास नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातील पाण्याच्या पातळीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपाययोजना केल्या जातील. धरणात पाण्याचा साठा मुबलक झाल्याने यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही, असा दिलासा जिल्हावासियांना मिळाला आहे.(Barvi Dam)

१०० टक्के गळती थांबविण्यात डायव्हर्सच्या प्रयत्नांना यश

बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून गेल्या काही दिवसांपासून होणारी गळती बुधवारी अखेर पूर्णपणे थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. पाण्याखालील तज्ज्ञ डायव्हर्सच्या मदतीने ही १०० टक्के गळती अटकाव करण्यात आली आहे. धरणातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासन प्रयत्नशील होते. धरणाची पाणीपातळी वाढत असताना स्वयंचलित दरवाज्यांमधून पाण्याची गळती होत असल्याने साठ्यावर परिणाम होत होता. अखेर बुधवारी गळती पूर्ण पणे बंद झाली आहे. बुधवारी पाण्याखालील डायव्हर्स उतरवून गळतीचे नेमके ठिकाण शोधून त्यावर तातडीने दुरूस्ती करण्यात आली.(Barvi Dam)

या संदर्भात एमआयडीसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता धरणाच्या कोणत्याही स्वयंचलित पाण्याची गळती होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे धरणात येणारे प्रत्येक थेंब पाणी साठवले जाणार आहे. पावसाळ्यात पाणी वाचविण्यासाठी झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Barvi Dam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.