
India Boxing Finals CWG 2026 : ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतीय बॉक्सर्सनी दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. स्कॉटिश इव्हेंट कॅम्पस (SEC) येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने सर्व १० पैकी १० सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. यामुळे शनिवारी (१ ऑगस्ट) होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचे ६ महिला आणि ४ पुरुष बॉक्सर सुवर्णपदकासाठी रिंगमध्ये उतरतील. एकाच दिवशी सर्व उपांत्य सामने जिंकत, भारताने राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वात प्रभावी कामगिरी केली आहे.
भारतानंतर इंग्लंडने सात विजयांसह दुसरे स्थान मिळवले, तर उत्तर आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी तीन बॉक्सर अंतिम फेरीत पोहोचले आहेत. (Commonwealth Games 2026)
महिला खेळाडूंची दमदार कामगिरी
महिलांच्या ५४ किलो (बँटमवेट) गटात प्रीतीने झांबियाच्या कॅथरीन म्वापेचा ५-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कार्लेट सवाना डेलगाडोशी होईल.
हेही वाचा: AI व्हिडिओचा सापळा; काँग्रेस नेते Bhai Jagtap अडचणीत, महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल
महिलांच्या ५७ किलो गटात भारताच्या जास्मिनने लेसोथोच्या रापेलंग मासेलेलाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर ७० किलो गटात भारताच्या अरुंधती चौधरीने गतविजेती आणि वेल्सची स्टार बॉक्सर रोझी एक्लेस हिला ४-० अशा निर्णयाने पराभूत केले. (Commonwealth Games 2026)
महिलांच्या ५१ किलो गटात साक्षी चौधरीने कॅनडाच्या अंबर-जेन वॉलचा सहज पराभव केला. लाइटवेट (६० किलो) गटात भारताच्या प्रियाने इंग्लंडच्या लुसी किंग्स-व्हीटलीला मात देत अंतिम फेरी गाठली.
महिलांच्या ७५ किलो गटात ऑलिम्पिक पदकविजेती लव्हलिना बोरगोहेनने तुवालूच्या तारोना ताफाकीवर एकमताने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. (Commonwealth Games 2026)
पुरुष गटातही भारतीयांचा दबदबा
पुरुषांच्या ५५ किलो गटात जादुमणी सिंगने नामिबियाच्या फिलिप हाओसेबचा ५-० ने पराभव केला. तर ८० किलो गटात अंकुश पांघालने कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर ५-० अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली.
दुसरीकडे, ६० किलो लाइटवेट उपांत्य फेरीत सचिन शिवचने वेल्सच्या ओवेन हॅरिस-अॅलनचा पराभव केला. तर, दिवसातील अखेरच्या सुपर हेवीवेट (९०+ किलो) सामन्यात भारताच्या नरेंद्र बेरवालने त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नायजेल पॉलचा पराभव केला.(Commonwealth Games 2026)
सुवर्णपदकासाठी उतरणारे भारताचे १० बॉक्सर:
महिला (६)
- साक्षी चौधरी (५१ किलो)
- प्रीती पवार (५४ किलो)
- जास्मिन लंबोरिया (५७ किलो)
- प्रिया घंघास (६० किलो)
- अरुंधती चौधरी (७० किलो)
- लव्हलिना बोरगोहेन (७५ किलो) (Commonwealth Games 2026)
हेही वाचा: Commonwealth Games 2026 : तेजस्वीन शंकरने रचला इतिहास! डेकॅथलॉनमध्ये पटकावले कांस्य पदक
पुरुष (४)
- जादुमणी सिंग (५५ किलो)
- सचिन शिवच (६० किलो)
- अंकुश पांघाल (८० किलो)
- नरेंद्र बेरवाल (९०+ किलो)
शनिवारी अंतिम लढती
शनिवार, १ ऑगस्ट रोजी बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम दिवस असून दोन सत्रांमध्ये अंतिम सामने खेळवले जाणार आहेत. १४ सुवर्णपदकांचा निर्णय होणार असून भारताला विक्रमी सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. (Commonwealth Games 2026)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

