प्रतिनिधी
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप(Bhai Jagtap)यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे.(Bhai Jagtap)
तक्रारीनुसार, @Bhaijagtap1 या एक्स (X) खात्यावरून दिल्ली पोलिसांचे डीसीपी सुमित झा यांचा असल्याचा भास निर्माण करणारा AI-जनरेटेड व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. प्राथमिक पडताळणीत संबंधित व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले असून, त्याद्वारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे, सरकारबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरविणे आणि चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.(Bhai Jagtap)
(हेही वाचा – Commonwealth Games 2026 : भालाफेक स्पर्धेत भारताची दुहेरी मुसंडी; नीरज चोप्राला रौप्य, यशवीर सिंहला कांस्य पदक )
एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, संबंधित व्हिडिओमध्ये दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्याचे कथित वक्तव्य असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच हा व्हिडिओ AI तंत्रज्ञानाद्वारे बनावटरीत्या तयार करण्यात आल्याचे स्पष्ट करत त्याचा इन्कार केला होता, असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.(Bhai Jagtap)
या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सुरू असून, संबंधित सोशल मीडिया खाते, व्हिडिओची निर्मिती, प्रसारण आणि त्यामागील तांत्रिक बाबींचा सखोल तपास केला जात आहे.(Bhai Jagtap)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

