
-
प्रतिनिधी
Missing Child Reunited जोगेश्वरी पोलिसांनी तत्परता आणि सतर्कता दाखवत हरवलेल्या आठ वर्षीय विशेष (स्पेशल) मुलाचा अवघ्या दीड तासात शोध घेऊन त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिले. पोलिस नाईक जगन्नाथ मिसाळ यांच्या दक्षतेमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली. (Missing Child Reunited)
शुक्रवारी (३१ जुलै) सायंकाळी जोगेश्वरी (पूर्व) येथील सुभाष रोड परिसरात गस्त घालत असताना पोलिस नाईक जगन्नाथ मिसाळ यांना सुमारे आठ वर्षांचा मुलगा एकटाच रडत असल्याचे दिसून आले. मुलाला नाव आणि पत्ता विचारला असता तो बोलू शकत नव्हता. तो केवळ “अब्बा” आणि “अम्मा” एवढेच शब्द उच्चारत होता. (Missing Child Reunited)
(हेही वाचा – ‘अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र’ ठरणार जागतिक ज्ञानपीठ, भूमिपूजन प्रकल्पादरम्यान उपमुख्यमंत्री Eknath Shinde म्हणाले…)
यानंतर पोलिसांनी मुलाच्या टी-शर्टवरील शाळेचे नाव पाहून संबंधित शाळेशी संपर्क साधला. तेथून मिळालेल्या माहितीनुसार पुढील शाळेशी संपर्क साधण्यात आला. शिक्षकांच्या मदतीने मुलाची ओळख पटविण्यात आली. त्याचे नाव मोहम्मद शहबाज अन्सारी (वय ८) असल्याचे तसेच त्याच्या पालकांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांच्याशी संपर्क साधला. (Missing Child Reunited)
पालकांना जोगेश्वरी पोलीस ठाण्यात बोलावून आवश्यक खातरजमा केल्यानंतर मुलाला सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या संवेदनशील आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल जोगेश्वरी पोलिसांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. (Missing Child Reunited)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
