CDSCOकडून १५९ औषधांचे नमुने NSQम्हणून घोषित, महाराष्ट्रातील १४ नमु्न्यांचा समावेश

71
CDSCOकडून १५९ औषधांचे नमुने NSQम्हणून घोषित, महाराष्ट्रातील १४ नमु्न्यांचा समावेश
CDSCOकडून १५९ औषधांचे नमुने NSQम्हणून घोषित, महाराष्ट्रातील १४ नमु्न्यांचा समावेश

CDSCO : देशात औषधांची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) (Central Drugs Standard Control Organisation) केलेल्या तपासणी मोहिमेचा एक भाग म्हणून मे २०२६ च्या मासिक गुणवत्ता तपासणी अहवालात एकूण १५९ औषधांचे नमुने ‘मानक गुणवत्तेचे नाहीत’ (एनएसक्यू) (Not of Standard Quality) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील १४ नमुन्यांचा समावेश आहे. या अहवालामुळे पुन्हा एकदा औषध निर्मिती आणि पुरवठा साखळीतील गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अहवालानुसार, केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळांनी तपासलेल्या औषधांच्या ४६ बॅच विहित मानकांची पूर्तता करू शकल्या नाहीत, तर विविध राज्यांतील औषध चाचणी प्रयोगशाळांनी तपासलेले ११३ औषधांचे नमुने गुणवत्ता मानकांपेक्षा कमी दर्जाचे आढळले. ही औषधे विविध उपचार पद्धतींमधील असून, आपले रुग्ण त्याचा वापर करतात.

हेही वाचा  –  Dombivli च्या ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चायनीज हॉटेल चालकासह ३ जण अटकेत

NSQ म्हणजे काय ?

सीडीएससीओ (CDSCO) नुसार, एखादे औषध एनएसक्यू (NSQ) म्हणून घोषित केले जाते याचा अर्थ असा की, ते चाचणीदरम्यान ठरवलेल्या एक किंवा अधिक गुणवत्ता मानकांमध्ये अयशस्वी ठरले आहे. यामध्ये सक्रिय औषधीय घटकाचे (API) प्रमाण, परिमाण, शुद्धता आणि इतर तांत्रिक मापदंडांचा समावेश असू शकतो. तसेच नियामक संस्थेने स्पष्ट केले आहे की, एखाद्या औषधाची एकच बॅच एनएसक्यू (NSQ) आढळण्याचा अर्थ असा नाही की त्याच औषधाच्या सर्व बॅचेस किंवा संपूर्ण उत्पादन निकृष्ट दर्जाचे आहे. हा अहवाल केवळ चाचणी केलेल्या विशिष्ट बॅचेसपुरताच मर्यादित असतो.

मे २०२६च्या अहवालानुसार, बनावट औषधाचे एक प्रकरण आसामधून नोंदवले गेले आहे. एका अनधिकृत उत्पादकाने दुसऱ्या कंपनीच्या मालकीच्या ब्रँडचा वापर करून हे औषध तयार केल्याचे तपासात उघड झाले. सीडीएससीओने म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि दोषींवर ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा, १९४० आणि संबंधित नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.

बाजारातून सदोष औषधे…
नियामक संस्थेनुसार, राज्य औषध नियंत्रक आणि चाचणी प्रयोगशाळांच्या सहकार्याने औषधांच्या नमुन्यांची नियमितपणे चाचणी केली जाते. जी औषधे एन. एस. क्यू. किंवा बनावट असल्याचे आढळून येते, ती बाजारातून काढून टाकण्याची, विक्री थांबवण्याची आणि संबंधित उत्पादकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.