Rajasthan: जैसलमेरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात, मेजर हुतात्मा, २ लेफ्टनंट गंभीर जखमी

72
Rajasthan: जैसलमेरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात, मेजर हुतात्मा, २ लेफ्टनंट गंभीर जखमी
Rajasthan: जैसलमेरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात, मेजर हुतात्मा, २ लेफ्टनंट गंभीर जखमी

Rajasthan: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात लष्कराचे मेजर हुतात्मा झाले असून दोन लेफ्टनंट गंभीर जखमी झाले आहेत. हमजा आरिफ (२६) असे हुतात्मा झालेल्या मेजरचे नाव असून महिनाभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. लष्करी तळावर परतत असताना त्यांच्या टाटा सफारी गाडीची रस्त्यावर उभ्या असलेल्या एका उंटाला अचानक धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडी चार ते पाच वेळा पलटी झाली आणि सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत गेली.

टीव्ही ९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री सुमारे साडेबारा वाजता सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थय्यात परिसरात हा अपघात घडला. मेजर हमजा आरिफ हे त्यांचे दोन सहकारी, लेफ्टनंट आयुष्मान आणि अभिनव राठोड यांच्यासोबत आपली ड्युटी पूर्ण करून लष्करी तळावर परतत होते. लष्करी तळाजवळ पोहोचताच रस्त्यावर अचानक एक उंट आला. चालकाला गाडी सावरण्याची संधी मिळाली नाही आणि भरधाव एसयूव्हीची उंटाला धडक बसली.

हेही वाचा – US Iran War : अमेरिका, इराण संघर्षात फेब्रुवारीपासून १६ भारतीयांचा मृत्यू; संसदेत माहिती

दोघांचीही प्रकृती चिंताजनक
उंटाला धडकल्यानंतर लष्कराची एसयूव्ही चार ते पाच वेळा उलटली आणि सुमारे १०० मीटरपर्यंत रस्त्यावर फरफटत गेली. अपघाताचा आवाज ऐकून नागरिक आणि लष्करी जवान घटनास्थळी धावले. तात्काळ मदत आणि बचाव कार्य राबवत तिन्ही अधिकाऱ्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मेजर हमजा आरिफ यांना मृत घोषित केले. ते मध्य प्रदेशचे रहिवासी होते आणि सुमारे महिनाभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. जखमी लेफ्टनंट आयुष्मान आणि अभिनव राठोड यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

लष्करी पोलिसांकडून तपास सुरू
प्राथमिक तपासानुसार, रस्त्यावर अचानक आलेल्या उंटामुळे हा अपघात झाला असावा, असे सदर पोलीस ठाण्याचे एएसआय जगदीश चरण यांनी सांगितले. याबाबत स्थानिक पोलीस आणि लष्करी पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.