-
ऋजुता लुकतुके
Rohit Sharma भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले असले, तरी त्याचं वय पाहता, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याला स्थान मिळावे का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी या विषयावर स्पष्ट मत व्यक्त करत, “हे विधान वादग्रस्त ठरेल, पण २०२७ विश्वचषकासाठी रोहित शर्मा माझी निवड नसेल,” असे म्हटले आहे. (Rohit Sharma)
रोहितची इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र २०२७ विश्वचषकाला अजून वर्षभराहून अधिक कालावधी शिल्लक असल्याने तोपर्यंत रोहितचा फिटनेस आणि सातत्य कायम राहील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर एका चर्चेदरम्यान मांजरेकर यांना रोहितच्या भविष्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. (Rohit Sharma)
(हेही वाचा – FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषकात आत्मघातकी गोलचा नकोसा विक्रम)
त्यावर उत्तर देताना मांजरेकर म्हणाले, “मी भविष्यातील संघाचा विचार करेन. त्यामुळे २०२७ विश्वचषकासाठी रोहित शर्मा माझी निवड नसेल. हे मत वादग्रस्त ठरेल, याची मला जाणीव आहे.” त्यांच्या मते, भारतीय संघाने आता पुढील पिढीतील खेळाडूंना संधी देत भविष्यासाठी तयारी सुरू ठेवली पाहिजे. (Rohit Sharma)
रोहितच्या जागेसाठी यशस्वी जयस्वालसारखे युवा फलंदाज दावेदारी करत असल्याचेही मांजरेकर यांनी अधोरेखित केले. गेल्या काही महिन्यांत जयसवालने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, भविष्यातील संघबांधणीत अशा खेळाडूंना प्राधान्य देण्याची वेळ आल्याचे त्यांनी सुचवले. (Rohit Sharma)
(हेही वाचा – TET Exam Leak : ‘दीड कोटी द्या आणि पेपर घ्या…’; TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांकडून धक्कादायक खुलासा!)
मात्र क्रिकेटविश्वात या विषयावर मतभेदही आहेत. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू महम्मद कैफ यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही २०२७ विश्वचषकात भारतासाठी खेळतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या मते, दोघांकडे अजूनही मोठ्या स्पर्धांमध्ये सामने जिंकून देण्याची क्षमता आहे. (Rohit Sharma)
रोहित शर्माने गेल्या काही वर्षांत भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. त्याचा अनुभव, नेतृत्वगुण आणि मोठ्या सामन्यांतील कामगिरी लक्षात घेता त्याला पूर्णपणे बाजूला ठेवणे सोपे नाही. मात्र वाढते वय, फिटनेस आणि युवा खेळाडूंची दावेदारी यामुळे निवड समितीसमोर कठीण निर्णय उभा राहणार आहे. (Rohit Sharma)
(हेही वाचा – US-Iran Conflict : आठवड्याभरातच शांततेची घडी मोडली; अमेरिका इराणमध्ये पुन्हा युद्धाची ठिणगी; भारतावर काय परिणाम संभावतात?)
सध्या तरी रोहितचे लक्ष इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेवर आहे. त्या मालिकेतील त्याची कामगिरी २०२७ विश्वचषकाच्या दृष्टीने सुरू झालेल्या चर्चेला नवी दिशा देऊ शकते. त्यामुळे आगामी काही महिने रोहित शर्मा आणि भारतीय संघ या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. (Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

