Shivrajyabhishek Sohala : कल्याण-डोंबिवलीत शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा

महापौर-उपमहापौरांकडून छत्रपतींना अभिवादन

69
Celebration of Shivrajyabhishek with floral offerings.
Shivrajyabhishek Sohala : कल्याण-डोंबिवलीत शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा
  • कल्याण, प्रतिनिधी

Shivrajyabhishek Sohala                   कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि शिवभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कल्याण-डोंबिवलीचा कानाकोपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेला होता. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. (Shivrajyabhishek Sohala)

(हेही वाचा – TET चा पेपरही फुटला, पण लोकांच्या रागाचा बांध का फुटत नाही? मनसे नेते Raju Patil यांचा सरकारवर घणाघात)

महापालिका मुख्यालयातही शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, सहआयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भारत बुळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करत प्रेरणा घेण्याचा निर्धार व्यक्त केला. (Shivrajyabhishek Sohala)

(हेही वाचा – पुतिनच्या यांचा सर्वात विश्वासू हेर Sergei Ivanov यांचा अंत; मृत्यू भोवती वाढले गूढ)

डोंबिवलीतही शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. पूर्वेकडे मानपाडा रोडला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास उपमहापौर राहूल दामले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त कांचन गायकवाड, सहआयुक्त जयराम शिंदे, प्रसाद ठाकूर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेच्या विचारांवर चालण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी शिवप्रेमींनी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. भगवे झेंडे, घोषणांनी परिसर दुमदुमला. महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे शिवरायांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. (Shivrajyabhishek Sohala)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.